रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शक्तीमान’ रणवीर सिंह साकारणार म्हंटल्यावर नको नको ते बोलले, न्यूड सीनवरुनही हिणावलं, आता मुकेश खन्नांनी डिलीट केला व्हिडीओ कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 19, 2024 | 11:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mukesh Khanna on Ranveer singh

'शक्तीमान' रणवीर सिंह साकारणार म्हंटल्यावर नको नको ते बोलले, न्यूड सीनवरुनही हिणावलं, आता मुकेश खन्नांनी डिलीट केला व्हिडीओ कारण…

९० च्या दशकातील सगळ्या लहान मुलांची आवडती मालिका म्हणजे ‘शक्तीमान’. या मालिकेला लहानांबरोबरच मोठ्यांचेही मनोरंजन केले. १९९७ ते २००५ या कालावधीमध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. नंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करुन आहे. या मालिकेतील महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘शक्तीमान’ म्हणजे गंगाधरने एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता जवळपास १८ वर्षांनी ‘शक्तीमान’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पण या मालिकेतील ‘शक्तीमान’च्या भूमिकेसाठी करण्यात आलेल्या निवडीबद्दल आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. (Mukesh Khanna on Ranveer singh)

‘शक्तीमान’ ही गाजलेली मालिका आता चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या चित्रपटातील ‘शक्तीमान’ या महत्त्वाच्या भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंहची निवड करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. यावर आता मुकेश खन्ना यांनी रणवीरच्या निवडीबद्दल विरोध दर्शवला आहे. त्याबद्दल त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर युट्यूबच्या एका व्हिडीओची लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने रणवीरला खडे बोल सुनावले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांनी हा व्हिडीओ डिलिट केला आहे.

आणखी वाचा – बादशाहच्या कॉन्सर्टमध्ये हनी सिंगच्या चाहत्यांचा गोंधळ, ‘ते’ दृश्य पाहून गायक भडकला, म्हणाला,”पापा का कमबॅक…”

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

ते व्हिडीओमध्ये म्हणाले की, “सर्व सोशल मीडियावर रणवीर ‘शक्तीमान’ची भूमिका साकारणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. तेव्हा मी शांत होतो मात्र आता वृत्तवाहिन्यादेखील या बातम्या देत आहेत. त्यामुळे मला बोलणे भाग पडत आहे. अशी प्रतिमा असणारी व्यक्ती कितीही मोठा कलाकार असला तरीही ‘शक्तीमान’ होऊ शकत नाही. मला ही निवड आवडली नाही”.

आणखी वाचा – “माझ्या आदराचा गैरवापर…”, रणवीर शौरीचे महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाला, “पूजाला डेट करत होतो तेव्हा…”

यानंतर त्यांनी रणवीरच्या नग्न फोटोशूटवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले होते की, “जर पूर्ण शरीर दाखवून स्मार्ट बनता येत असेल तर दुसऱ्या देशामध्ये जाऊन रहा. मी निर्मात्यांना देखील म्हणालो की तुमची स्पर्धा कोण्या बॅटमॅन किंवा स्पायडरमॅनशी नाही आहे. शक्तीमान हा केवळ सुपरहिरो नाही तर एक शिक्षकही आहे”.

मुकेश खन्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. यामध्ये काहीजण मुकेश यांच्या मताला पाठिंबा देत आहेत तर काहीजण त्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे.     

Tags: actrorMukesh kahnnaranveer singhshaktimaan movieshaktimaan serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Navra Maza Navsacha 2 Shooting

नवस फेडायला पोहोचले थेट कोकणात, ‘नवरा माझा नवसाचा २’च्या शूटिंगसाठी कलाकारांचा ट्रेनने प्रवास, धमाल-मस्ती अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.