ओटीटी माध्यमांमुळे चित्रपट व वेबसीरिज पाहण्याच्या अनुभवात अनेक बदल घडून आले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टार, अॅमेझोन प्राइम, जिओ सिनेमा, प्राइम व्हिडिओ आणि यांसारख्या अनेक ओटीटी माध्यमांवर दर आठवड्याला नवनवीन कलाकृती प्रदर्शित होत असतात. तुम्हीही अशा रंजक चित्रपट व वेबसीरिजच्या शोधात असाल तर जाणून घ्या, येत्या आठवड्यात अजय देवगणचा ‘शैतान’ आणि इमरान हाश्मीच्या ‘शोटाइम’सह अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. चला तर जाणून घेऊयात…
शो टाइम : मिहीर देसाई व अर्चित कुमार दिग्दर्शित, ‘शो टाईम’ हा मनोरंजन विश्वातील व बॉलीवूडच्या कोट्यवधी उद्योगाच्या मागे नेमके काय चालते यावर बेतली आहे. घणेशाही आणि सत्तासंघर्ष हा या सिरीजच्या शीर्षस्थानी आहे. ‘शो टाइम’मध्ये इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहेत. ८ मार्च पासून डिस्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.
हनुमान : तेजा सज्जा स्टारर पौराणिक सुपरहिरो चित्रपट ‘हनुमान’ झी-५ वर ८ मार्च रोजी रिलीज होणार होता, परंतु आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हनुमान चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. अंजनाद्रीच्या लोकांना वाचवण्यासाठी, तो मायकेलशी सामना करतो, जो त्याला एक शक्तिशाली सुपरहिरो बनवेल अशी शक्ती मिळवण्याची इच्छा बाळगतो. अशी या चित्रपटाची कथा आहे. ‘हनुमान’च्या प्रदर्शनाची तारीख ८ मार्च नंतर आता १६ मार्च करण्यात आली आहे.
मेरी ख्रिसमस : चित्रपटगृहांत यशस्वी कामगिरी केल्यानंतर ‘मेरी ख्रिसमस’चे निर्माते हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शित, ‘मेरी ख्रिसमस’ मध्ये कॅटरिना कैफ व विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९८० च्या बॉम्बेवर बेतलेला आहे, कथेत अल्बर्ट (सेतुपती) यांचा समावेश आहे जो शहरात परततो आणि ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आई मारिया (कैफ) आणि तिच्या मुलाला भेटतो. जसजशी रात्र पुढे जाते, तसतसे मारियाच्या फ्लॅटमध्ये एक मृतदेह सापडल्याने या कथेला वळण मिळते. हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
महाराणी : हुमा कुरेशी एक अपघाती मुख्यमंत्री म्हणून अभिनीत आहे जिला सत्तेत राहण्यासाठी राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी, तिचा स्वतःचा पती, जात आणि लैंगिक गतिमानता यांच्याशी लढावे लागते सोनी लिव्ह या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. सुभाष कपूरच्या या सरिजच्या आधीच्या दोन सीजनने देखील धुमाकूळ घातला होता आणि त्याला प्रेक्षकांचे देखील प्रेम मिळाले होते.आता या सीझनबद्दल बोलायचे झाले तर याचे दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले असून पूर्वीप्रमाणेच यावेळीही कथेत अनेक ट्विस्ट आले आहेत. ज्यामुळे तुमची उत्सुकता कायम राहील.