शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानच्या लेकीचा बाथटबमधील व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, सुहाना खानला सुनावलं, म्हणाले, “रमजानमध्ये तरी लाज बाळगा”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 18, 2024 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Shahrukh Khan's daughter Suhana is being trolled for a video she posted on social media

शाहरुख खानच्या लेकीचा बाथटबमधील व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, सुहाना खानला सुनावलं, म्हणाले, "रमजानमध्ये तरी लाज बाळगा"

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान हिने आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल थेअवत मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं आहे. सध्या सिनेसृष्टीत सुहाना आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. आपला लूक व फॅशन स्टाइलने तिने चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुहाना खान हिचा ‘द आर्चिज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर आता सुहाना खान तिच्या प्रत्येक कृतीमुळे चर्चेत येते. 

सोशल मीडियावर सुहानाबद्दल कायमच चर्चा सुरू असतात. अगदी सुहाना काय कपडे परिधान करते इथपासून ते ती कुठे जाते? काय करते?, यावरही नेटकऱ्यांचे बारीक लक्ष असते. अशातच आता या सगळ्यादरम्यान, सुहानाचा बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओमुळे सुहाना नेटकऱ्यांच्या चांगलीच तावडीत सापडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tira (@tirabeauty)

सुहानाने नुकतंच बाथटबमध्ये एक बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो व व्हिडिओ तिने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये सुहानाने एका ब्युटी प्रोडक्टसाठी जाहिरात केली आहे. व्हिडीओत बाथटबमध्ये असणारी सुहाना ग्लॅमरस दिसत आहे. सुहानाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुक केले आहे. तर, काहींनी तिच्यावर टीका केली आहे. 

आणखी वाचा – विमानतळावर असलेल्या टीव्हीवर सुरु होता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम, ‘ते’ दृश्य पाहून भारावले समीर चौघुले, सेल्फीही घेतला अन्…

सुहानाच्या या व्हिडीओखाली अनेकांनी नकारात्मक कमेंट्स करत तिच्या या कृतीला विरोध केला आहे. अनेकांनी “रमजान आहे याची लाज बाळगा, रमजानमध्ये हे करणे योग्य दिसत नाही, रमजानच्या पवित्र महिन्यात हे असे व्हिडीओ करणे शोभत नाही.” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी मात्र त्यांना सुहानाचा हा व्हिडीओ आवडला असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी तिच्या लूकचेही कौतुक केले आहे.

आणखी वाचा – “आजही सोनू निगमच्या पाया पडतो”, अवधूत गुप्तेचा खुलासा, म्हणाला, “एकदा एखाद्याला…”

दरम्यान, सुहाना खान नुकतीच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये त्याच्याबरोबर अगस्त्य नंदा व खुशी कपूर देखील दिसले होते. सुहानाने ‘द ग्रे पार्ट’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. त्यात आता सुहाना लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 

Tags: bollywood actressBollywood entertainment newssuhana khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kili Paul On Trending Song

Video : आधी मराठी गाण्यांवर डान्स आता किली पॉलने गायलं 'गुलाबी साडी' गाणं, मराठी ऐकून सगळेच भारावले, म्हणाले, "तुझं आधार कार्ड…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.