शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आधी मराठी गाण्यांवर डान्स आता किली पॉलने गायलं ‘गुलाबी साडी’ गाणं, मराठी ऐकून सगळेच भारावले, म्हणाले, “तुझं आधार कार्ड…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 18, 2024 | 2:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kili Paul On Trending Song

Video : आधी मराठी गाण्यांवर डान्स आता किली पॉलने गायलं 'गुलाबी साडी' गाणं, मराठी ऐकून सगळेच भारावले, म्हणाले, "तुझं आधार कार्ड..."

सोशल मीडियावर मराठी ट्रेंडिंग गाण्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. सध्या मराठी गाण्यांची क्रेझ या रीलवर अधिक प्रमाणात असलेली पाहायला मिळत आहे. सध्या एक मराठमोळं गाणं रीलवर ट्रेंड झालं असून केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात या गाण्याची क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. हे गाणं म्हणजे ‘गुलाबी साडी’. प्रेक्षकांना संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने वेडं लावलं आहे. एवढंच नाहीतर माधुरी दीक्षित, रेमो डिसुझा यांच्यासह विविध कलाक्षेत्रातील मंडळींना या गाण्याची भुरळ पडली आहे. (Kili Paul On Trending Song)

सोशल मीडियावर अनेकजण या ट्रेंडिंग गाण्यावर रील करताना दिसत आहेत. अशातच टांझानियाच्या किली पॉललाही या गाण्याची भुरळ पडली आहे. किली पॉलच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने चक्क ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं गात त्यावर ठेका धरला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – विमानतळावर असलेल्या टीव्हीवर सुरु होता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम, ‘ते’ दृश्य पाहून भारावले समीर चौघुले, सेल्फीही घेतला अन्…

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

सध्या सोशल मीडियावर किलीच्या बऱ्याच मराठी गाण्यांच्या व्हिडीओंची चर्चा होताना दिसते. “काय सांगू राणी मला गाव सुटना”, “मावळं आम्ही वादळ आम्ही”, “नांदण नांदण रमाचं नांदण” या मराठी गाण्यांबरोबरच किलीने त्याची बहिण नीमाबरोबर ‘बहरला हा मधुमास नवा’, ‘एका वाघाची शिकार एका हरणीने केली’ या मराठी गाण्यांवर ठेका धरतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते, या त्याच्या रीलला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर आता त्याच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याला पसंती मिळत असून या व्हिडीओने लाखोंचा टप्पा पार केला आहे.

आणखी वाचा – “न्यूड सीन करणाऱ्यांना…”, रणवीर सिंह शक्तीमानची भूमिका साकारण्यावरुन भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, “दुसऱ्या देशात जा आणि…”

सोशल मीडिया स्टार किली पॉल हा बराच लोकप्रिय आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. बरेचदा तो बॉलिवूड गाण्यांचे लिप्सिंग करताना वा गाण्यावर थिरकतानाचे व्हिडीओ शेअर करत असतो. चाहते देखील किली पॉलच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरुन प्रतिसाद देताना दिसतात. यावरुन किली ही मराठी गाण्यांच्या प्रेमात पडला असल्याचं कळतंय.

Tags: entertainmentgulabi sadigulabi sadi songKili Paul On Trending Songtrending song
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Tharla Tar Mag Fame Amit Bhanushali thanked his wife by with sharing special photo

'ठरलं तर मग'मधील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? लूकमध्ये अभिनेत्रींनाही देते टक्कर, म्हणाला, "तू नेहमीच मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.