बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान हिने आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल थेअवत मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं आहे. सध्या सिनेसृष्टीत सुहाना आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. आपला लूक व फॅशन स्टाइलने तिने चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुहाना खान हिचा ‘द आर्चिज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर आता सुहाना खान तिच्या प्रत्येक कृतीमुळे चर्चेत येते.
सोशल मीडियावर सुहानाबद्दल कायमच चर्चा सुरू असतात. अगदी सुहाना काय कपडे परिधान करते इथपासून ते ती कुठे जाते? काय करते?, यावरही नेटकऱ्यांचे बारीक लक्ष असते. अशातच आता या सगळ्यादरम्यान, सुहानाचा बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओमुळे सुहाना नेटकऱ्यांच्या चांगलीच तावडीत सापडली आहे.
सुहानाने नुकतंच बाथटबमध्ये एक बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो व व्हिडिओ तिने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये सुहानाने एका ब्युटी प्रोडक्टसाठी जाहिरात केली आहे. व्हिडीओत बाथटबमध्ये असणारी सुहाना ग्लॅमरस दिसत आहे. सुहानाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुक केले आहे. तर, काहींनी तिच्यावर टीका केली आहे.
सुहानाच्या या व्हिडीओखाली अनेकांनी नकारात्मक कमेंट्स करत तिच्या या कृतीला विरोध केला आहे. अनेकांनी “रमजान आहे याची लाज बाळगा, रमजानमध्ये हे करणे योग्य दिसत नाही, रमजानच्या पवित्र महिन्यात हे असे व्हिडीओ करणे शोभत नाही.” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी मात्र त्यांना सुहानाचा हा व्हिडीओ आवडला असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी तिच्या लूकचेही कौतुक केले आहे.
आणखी वाचा – “आजही सोनू निगमच्या पाया पडतो”, अवधूत गुप्तेचा खुलासा, म्हणाला, “एकदा एखाद्याला…”
दरम्यान, सुहाना खान नुकतीच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये त्याच्याबरोबर अगस्त्य नंदा व खुशी कपूर देखील दिसले होते. सुहानाने ‘द ग्रे पार्ट’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. त्यात आता सुहाना लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.