शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘डंकी’ चित्रपट आता ओटीटीवरही धुमाकूळ घालायला सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 10, 2024 | 5:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shah rukh khan starrer Dunki movie ott release on jio cinema from this date onwards

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता ‘डंकी’ चित्रपट ओटीटीवरही धुमाकूळ घालायला सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या वर्षी शाहरुख खानने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ असे तीन चित्रपट केले. या सर्व चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे चित्रपट ओटीटीवरही चांगलेच गाजले. मात्र, त्याच्या या तीन चित्रपटांपैकी ‘डंकी’ हा चित्रपट अजूनही ओटीटीवर आला नाही. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर आता शाहरुखचे अनेक चाहते या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अशातच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. शाहरुखचा डंकी’ हा चित्रपट लवकरच जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे ओटीटी अधिकार जिओ सिनेमाला देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘डंकी’ हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारीला ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. अर्थात, निर्मात्यांनी अद्याप याबाबत अजून काही अधिकृत घोषणा केलेली नाही.

आणखी वाचा – “हिला अभिनय जमत नाही”, ‘त्या’ व्यक्तीने तेजश्री प्रधानला हिणावलं, म्हणाला, “पूर्ण कॉपी…”

या चित्रपटात शाहरुख खानने हार्डी नावाच्या मुलाची मुख्य भूमिका साकारली होती. किंग खान व्यतिरिक्त या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. डंकीचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.

आणखी वाचा – असा होता भारतीच्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस, अमिताभ बच्चन यांचे घरही दाखवले अन्…; खास व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, डंकी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. जागतिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास ५०० कोटींची कमाई केली. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवरही मनोरंजन करायला सज्ज होणार आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.

Tags: डंकीओटीटी बातमीशाह रुख खानमनोरंजन बातमीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड चित्रपटbollywood actorBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood moviesbollywood newsdunkientertainment newsott newsshah rukh khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Nikhil Wagle Case

"गोळ्या झाडायच्या, हल्ला करायचा अन्…", निखिल वागळे हल्ला प्रकरणी मराठी कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, "जाहिर निषेध…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.