बिग बॉस मराठी ५’ हे पर्व खूप गाजले. या पर्वात कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील सामील झाले होते. त्यामुळे या पर्वाची मोठी चर्चा झाली. या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस च्या घरात सुरुवातीपासूनच दोन गट पाहायला मिळाले. एका गटात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण व जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक होते. तर दुसऱ्या गटात पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर धनंजय पोवार, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण आणि आणखी इतर स्पर्धक होते. (yogita chavan and ankita walawalkar meet)
या दोन्ही गटात कायम भांडण व मतभेद असल्याचेही प्रेक्षकांनी पाहिले. मात्र शो संपताच हे सगळे स्पर्धक आता एकमेकांचे मित्र झाले आहेत. बिग बॉस शो संपल्यानंतर बिग बॉसच्या अनेक स्पर्धकांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या. अशातच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनेही नुकतीच अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौगुले यांची भेट घेतली. या भेटीचे काही खास क्षण त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यावेळी अंकिताबरोबर तिचा होणारा नवरा कुणाल भगत हादेखील उपस्थित होता. त्यामुळे अंकिता, योगिता, कुणाल व सौरभ अशा चौघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला अंकिताने हटके कॅप्शनही दिलं आहे. “दोन अतिविचारी व दोन उत्तम संवादक हे एकाच फ्रेममध्ये” असं म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे. शिवाय नेटकऱ्यांना हे अतिविचारी व संवादक कोण आहेत हेही विचारलं आहे. या फोटोला नेटकऱ्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – 08 January Horoscope : वृषभ व मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस खास, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
अभिनेत्री हेमांगी कवीने या फोटोखाली तू (अंकिता) आणि योगिता अतिविचारी आणि कुणाल-सौरभ हे दोघे उत्तम संवादक असल्याचे म्हटलं आहे. तसंच या कमेंटवर अंकिताने ही “अगदी योग्य” असं म्हणत तिला उत्तर दिले आहे. दरम्यान, अंकीता वालावलकर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेमध्ये आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात ती कुणाल बरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटलं जात आहे.