सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्मेंद्र यांची गंभीर अवस्था पाहून पहिली पत्नी ढसाढसा रडली, लेकाने जवळ घेत सावरलं, व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 13, 2025 | 11:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dharmendra health update

धर्मेंद्र यांची गंभीर अवस्था पाहून पहिली पत्नी ढसाढसा रडली, लेकाने जवळ घेत सावरलं, व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी

Dharmendra health update : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८९ वर्षीय अभिनेत्याला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले की, धर्मेंद्रजींना सकाळी ७.३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला. आणि यापुढे त्यांच्यावर घरीच उपचार व्हावेत, अशी कुटुंबाची इच्छा आहे. धर्मेंद्र यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरु आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यांत धर्मेंद्र घरी असून अगदी हॉस्पिटलमध्ये असल्यासारखी त्यांची काळजी घेत आहेत.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्यावर होणारे उपचार पाहून अर्थातच काळजी वाढत आहे. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं दिसत आहे. आणि अशावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर आहे. सनी देओल व बॉबी देओलही वडिलांची काळजी घेताना दिसत आहेत. यावेळी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आली होती. नवऱ्याची गंभीर अवस्था पाहून प्रकाश कौरला अश्रू अनावर झाले.

आणखी वाचा – मुलं रात्रभर झोपली नाहीत, खूप जबाबदाऱ्या आणि…; धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी दिली अपडेट, म्हणाल्या, “देवाच्या हातात…”

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Singh Gosain (@dharmendrasinghgosain)

धर्मेंद्र यांना जवळ घेत प्रकाश कौर ढसाढसा रडताना दिसली. यावेळी सनी देओलने आईला जवळ घेत तिचं सांत्वन केलं. नवऱ्याची ही गंभीर अवस्था पत्नीला पाहवली नाही. व्हिडीओमध्ये त्या, धर्मेंद्र यांना एकदा उठून त्यांच्याकडे पाहायला सांगत आहेत. त्या सनीला मिठी मारून देवाकडे प्रार्थना करत आहेत की, एक वेळा त्यांना बरं कर. “माझा जीव घे पण त्यांना बरं कर”, असं त्या रडत रडत बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा – लग्नानंतर हेमा मालिनी नाहीतर पहिल्या पत्नीसह राहत होते धर्मेंद्र, घटस्फोटही घेतला नाही; ‘सेकंड वुमन’चा टॅगही मिळाला पण…

धर्मेंद्र हे केवळ त्यांच्या करिअर आणि चित्रपटांमुळेच चर्चेत राहिले नाहीतर त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. चित्रपटात येण्यापूर्वीच त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले, जेव्हा ते १९ वर्षांचे होते. धर्मेंद्र यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर हेमा मालिनी कधीही धर्मेंद्र यांच्यासोबत राहिल्या नाहीत.

Tags: bollywood newsdharmendraDharmendra Health Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
sunny deol news

"तुम्हाला लाज नाही वाटत xxxx", घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींवर सनी देओल भडकला, म्हणाला, "तुमच्या घरी आई-वडील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.