रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्हाला लाज नाही वाटत xxxx”, घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींवर सनी देओल भडकला, म्हणाला, “तुमच्या घरी आई-वडील…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 13, 2025 | 1:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sunny deol news

"तुम्हाला लाज नाही वाटत xxxx", घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींवर सनी देओल भडकला, म्हणाला, "तुमच्या घरी आई-वडील…"

sunny deol news : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतले आहेत. त्यांच्यावर घरुनच उपचार सुरु आहेत. आता १३ नोव्हेंबरच्या सकाळी धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओल घराबाहेर स्पॉट झाला. घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना पाहून सनी देओल चांगलाच संतापला. त्याला पापाराझींचा राग आला. त्याने आधी हात जोडले आणि मग संताप व्यक्त केला. या व्हिडीओमध्ये सनी देओल म्हणत आहे की, “तुम्हा लोकांना लाज वाटली पाहिजे. तुझ्या घरी आई-वडील आहेत. तुम्हाला मुले आहेत. आणि तुम्ही इथे फक्त व्हिडीओ घेण्यासाठी जात आहात. तुम्हाला लाज नाही वाटत xxx”. यावेळी सनी देओल निळ्या शर्ट-ग्रे पँटमध्ये दिसला. त्याने काळी टोपीही घातली होती.

अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातही ते अनेक दिवस राहिले. धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र, आता ते उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यामुळेच आता त्यांचे कुटुंबीय त्यांना घरी घेऊन आले आहेत. धर्मेंद्र यांच्यावर आता घरुनच उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरही त्यांच्या घरी आले होते.

आणखी वाचा – धर्मेंद्र यांची गंभीर अवस्था पाहून पहिली पत्नी ढसाढसा रडली, लेकाने जवळ घेत सावरलं, व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी

मुंबई, महाराष्ट्र: अभिनेता सनी देओल अपने बंगले से बाहर निकलकर पत्रकारों से हाथ जोड़कर अपनी नाराजगी जाहिर की। pic.twitter.com/YurtyQGFL1

— IANS Hindi (@IANSKhabar) November 13, 2025

धर्मेंद्र जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये होते. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, गोविंदा, अमिषा पटेल हे बॉलिवूड कलाकार त्यांना भेटायला आले होते. अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनीही धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “गेले काही दिवस भावनिकदृष्ट्या खूप तणावपूर्ण होते. ते सुभाष के. झा यांना म्हणाले, “माझ्यासाठी ही सोपी वेळ नव्हती. धरमजींची तब्येत आमच्यासाठी खूप चिंतेची बाब आहे. त्यांची मुले रात्रभर झोपू शकत नाहीत. मी कमजोर होऊ शकत नाही, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. पण हो, तो घरी परतला याचा मला आनंद आहे. तो रुग्णालयातून बाहेर आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. त्याला त्याच्या लोकांमध्ये राहण्याची गरज आहे. बाकी सर्व काही देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा”.

आणखी वाचा – मुलं रात्रभर झोपली नाहीत, खूप जबाबदाऱ्या आणि…; धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी दिली अपडेट, म्हणाल्या, “देवाच्या हातात…”

धर्मेंद्र घरी असून अगदी हॉस्पिटलमध्ये असल्यासारखी त्यांची काळजी घेत आहेत.शावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर आहे. सनी देओल व बॉबी देओलही वडिलांची काळजी घेताना दिसत आहेत. यावेळी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आली होती. नवऱ्याची गंभीर अवस्था पाहून प्रकाश कौरला अश्रू अनावर झाले.

Tags: dharmendraDharmendra Health Updatesunny deol news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
rajkumar rao and patralekha

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना कन्यारत्न, लग्नाच्या वाढदिवशीच झाले आई-बाबा, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.