सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी शाळेची अवस्था…”, अक्षय केळकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “माझं कुठेच काहीच अडलं नाही कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 25, 2025 | 3:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi education benefits

"मराठी शाळेची अवस्था…", अक्षय केळकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, "माझं कुठेच काहीच अडलं नाही कारण…"

Marathi education benefits : सध्या सर्वत्र इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढलेला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळेच प्रादेशिक भाषांच्या शिक्षणात घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात तर मराठी भाषेचा वाद मोठ्या प्रमाणावर सुरु असलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडेच मराठी भाषेतील शिक्षणावरुन वाद सुरु असल्याचं दिसत आहे. मराठी शाळांमध्ये मुलं शिकण्यास जात नाहीत या प्रकरणावरुन बऱ्याच जणांनी भाष्य केलं आहे. यावरुन आता मराठी शाळेचं महत्त्व पटवून देणारा हेमंत ढोमे दिग्दर्शित “क्रांतीज्योती विद्यालय- मराठी माध्यम” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. यानंतर आता मराठमोळा अभिनेता अक्षय केळकरने मराठी शाळेबाबत शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

खूप वर्षानंतर त्याच्या लाडक्या सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अक्षयने त्याच्या शाळेला भेट दिली. अक्षयने खूप वर्षांनंतर त्याची शाळा पाहिल्याचं यामधून म्हटलं आहे. अक्षय इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “ही माझी मराठी शाळा. मी या शाळेत शिकलो. सहकार विद्या प्रसारक मंडळ. काल मी प्रमुख पाहुणा म्हणून शाळेत गेलो नव्हतो तर माझ्या शिक्षकांना भेटायला गेलो होतो”.

आणखी वाचा – हजारो झाडं जळून खाक, असंख्य पशू-पक्षी होरपळले आणि…; सयाजी शिंदेंच्या ‘देवराई प्रकल्पाला’ भीषण आग, नेमकं काय झालं?

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

व्हिडीओ शेअर करत अक्षय म्हणाला, “ही माझी मराठी माध्यमाची शाळा – सहकार विद्या प्रसारक मंडळ. इथेच माझं संपूर्ण शालेय शिक्षण झालं. काल पुन्हा शाळेत जायचा योग आला आणि तो ही माझ्या लाडक्या चित्रकला शिक्षक – बोके सरांच्या सेवा निवृत्ती समारंभाच्या निमित्ताने. खूप वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत जाऊन आणि माझ्या सगळ्या शिक्षकांना भेटून खूप आनंद झाला. आणि त्याहीपेक्षा एका गोष्टीचा खूप अभिमान वाटला ती म्हणजे – माझ्या शाळेच्या सर्व तुकड्या आजही तितक्याच विद्यार्थी संख्येने भरलेल्या आहेत जश्या माझ्या वेळी असायच्या. मराठी शाळेची अवस्था आणि सद्यस्थितीही आपण सगळेच जाणतो. पण अशा काळातही माझी शाळा त्याच ताकदीने उभी आहे याचा खरंच खूप आनंद झाला”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष; फोटो समोर

शेवटी त्याने लिहिलं, “मी मराठी शाळेत शिकलो, पुढे माझ्या आवडत्या क्षेत्रात post graduation ही पूर्ण केलं आणि मराठीतून शिक्षण घेतलं या कारणामुळे माझं कुठेच काहीच अडलं नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे माझे सर्व शिक्षक. आता त्यांना सेवा निवृत्तीच्या टप्प्यात बघणं खूप वेगळा अनुभव आहे. बोके सर, तुम्हाला तुमच्या सेवा निवृत्तीनंतरच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा”. अक्षयच्या या पोस्टवर चाहतेमंडळी त्याचं कौतुक करत आहेत.

Tags: akshay kelkarentertainmentmarathi education
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Sharmishtha Raut Divorce

दोन वर्ष डिप्रेशन, जीव देण्याचाही विचार आला आणि…; घटस्फोटादरम्यानच्या कठीण काळाबाबत शर्मिष्ठा राऊत म्हणाली, "त्या माणसाचा दोष नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.