Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत आता खूप मोठं वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आता अखेर प्रीतम प्रियाच्या नात्याला आबासाहेबांनी नकार दिलेला असतो. शिवाय प्रीतम आदित्य व पारू यांना घरातून बाहेर काढत त्यांना त्यांच्या घरी जायला सांगितलेलं असतं. आबासाहेबांसमोर प्रीतम हा अहिल्यादेवींचा मुलगा आहे हे सत्य येताच त्यांचा पारा आणखीनच चढतो. अहिल्याने २० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर जो धोका केला आहे, अगदी तसाच धोका प्रीतमही त्यांच्या मुलीला देईल या भीतीने ते या लग्नाला नकार देतात आणि त्यामुळे प्रिया व प्रीतम यांच्या प्रेमात मोठा दुरावा येतो. प्रीतम, आदित्य, पारू हे पुन्हा मुंबईत परतल्यानंतर अहिल्यादेवी खूप खुश होतात आणि इकडे अहिल्यादेवींनी आधीपासूनच प्रीतम व दिशा यांच्या लग्नाची तयारी सुरु केलेली असते.
ठरल्याप्रमाणे प्रीतमला बोहल्यावर चढण्यास भाग पडावं लागतं कारण प्रीतम हा प्रियाच्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन लग्न करण्यास तयार नसतो. त्यामुळे त्याचा नाईलाज असतो आणि त्याला दिशा बरोबर लग्न करायला तयार व्हावे लागते. मात्र आदित्य व पारुला हे काही पटत नाही. आदित्य म्हणतो की, तो दिशा बरोबर लग्न करुन सुखीच राहणार नाहीये, त्यामुळे आपल्याला काही ना काही करायला हवं. मात्र आदित्य त्याच्या आई पुढे काहीच बोलू शकत नाही. प्रीतमला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरु असतो. तेव्हा सर्वात आधी मुलाला हळद लावली जाते त्यामुळे प्रीतम हळद लावून घ्यायला म्हणून बसतो. अहिल्यादेवी त्यावेळेला खूप आनंदी असतात आणि प्रीतमला आनंदाने हळद लावतात. त्याच वेळेला दिशा घराबाहेर आलेली असते, कारण दिशा तिचा बॉयफ्रेंड करणला भेटायला आलेली भेटायला आलेली असते.
करण हा दिशाला प्रीतमच्या अनेक गोष्टी उघड पाडण्यास वेळोवेळी मदत करत आलेला असतो, त्यामुळे त्याला तिला भेटायला जाणं भाग असतं. करण घराबाहेर येतो तेव्हा तो दिशाला घराबाहेर बोलावतो आणि दिशाला हळद लावत सांगतो की, सर्वात पहिली हळद ही तुला माझ्या हातूनच लागायला हवी. असं म्हणत तो तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. तितक्यातच तिथे पारु येते आणि पारू हे सर्व काही पाहते. तेव्हा दिशा खूप घाबरते आणि दिशा काहीच न बोलता तिथून निघून जाते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 मध्ये आज होणार एलिमिनेशन, कोण सदस्य घेणार शेवटचा निरोप?
त्यानंतर पारूला कळतं की, तो मुलगा पुन्हा एकदा दिशा मॅडमला भेटायला आला होता. दिशा मॅडम आणि त्या मुलाचं नक्कीच काहीतरी सुरु आहे. ही गोष्ट आदित्य सरांना सांगायला हवी म्हणून ती आदित्यला सगळं काही जाऊन सांगते. आता आदित्य व पारू मिळून दिशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का?, हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे.