Aishwarya Narkar About Avinash Narkar: मराठी सिनेसृष्टीमध्ये पडद्यावर दिसणाऱ्या जोड्यांवर प्रेक्षक जितकं प्रेम करतात तितकंच प्रेम कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीला देखील मिळत असतं.सध्या अनेक कलाकार विवाहबंधनात अडकणार आहेत.या नव्या जोड्यांमध्ये काही एव्हरग्रीन जोड्या आजही प्रेक्षकांच्या तितक्याच आवडीच्या आहेत.(Aishwarya Narkar About Avinash Narkar)
अशीच एक एव्हरीग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर. कलाकार म्हणून गेला अनेक काळ ही जोडी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.त्यांच्या कामासोबतच ही जोडी सोशल मीडियावर देखील विशेष चर्चेत असते. त्यांचे ट्रेंडिंग गाण्यावरचे रिल्स सोशल मीडियावर वायरल होताना पाहायला मिळतात. आजही त्यांचा तो उत्साह काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते.
पाहा काय म्हणाल्या ऐश्वर्या नारकर? (Aishwarya Narkar About Avinash Narkar)
नुकतीच ऐश्वर्या व अविनाश यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्त ऐश्वर्या यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहलं आहे, ‘आता २५ हून अधिक वर्ष झाली. त्याने मला कायम पाठिंबा दिला. ज्या गोष्टी मी करू शकेन की नाही याची मलाच खात्री नव्हती अशा गोष्टी करायला त्याने मला प्रोत्साहन दिलं. मला स्वतःचा शोध घ्यायला मदत केली. काही बाबतीत आमची मतं वेगळी असली तरी प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेतो. यालाच आनंदी आयुष्य म्हणतात. मला माहितीये की एक मित्र म्हणून तू नेहमी माझ्यासोबत होतास, आहेस आणि यापुढेही असशील. न संपणारी मैत्री…’
हे देखील वाचा : “…अन् त्यावेळी राज ठाकरेंनी मला गाडीतून उतरवलं”, वंदना गुप्तेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “इथे मराठी माणूस…”
ऐश्वर्या यांची सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सुरु आहे. मालिकेतील रुपाली या त्यांच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांचं भभरून प्रेम मिळतं आहे.ऐश्वर्या व अविनाश दोघेही त्यांच्या फिटनेसची देखील विशेष काळजी घेतात. त्यांच्या योगाचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात.