घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील कमकुवत बाजू आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचं, हक्काचं घर असावं असंही वाटत असतं. घरासाठी अनेकजण स्वप्नही पाहतात. मात्र आपल्या आई-वडिलांचं घर हे कायम हृदयाच्या एका कोपऱ्यात असतं. त्या घराची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अगदी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंतचा प्रवास, त्यादरम्यान आलेल्या अडचणी, संकट या घराने पाहिलेली असतात. त्यामुळे आई-वडिलांचं घर हा नेहमीच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. बरेचदा अनेक कलाकार मंडळी त्यांच्या घराबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. (Titeeksha Tawde Mothers Home)
अशातच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडेने शेअर केलेल्या माहेरच्या घराची झलक सध्या चर्चेत आली आहे. तीन महिन्यांपूर्वीच तितीक्षा लग्नबंधनात अडकली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात तितीक्षा व सिद्धार्थचा विवाहसोहळा उरकला. सोशल मीडियावरही त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. मोजक्याच नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तितीक्षा व सिद्धार्थ यांनी लग्न केले.
लग्नानंतर तितीक्षाने लगेच कामाला सुरवात झाली. त्यानंतर थेट लग्नाला तीन महिने झाल्यानंतर तितीक्षा तिच्या नवऱ्याला घेऊन माहेरी गेली. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात असल्याने ती बरीच आनंदीही दिसली. तितीक्षा ही मूळची डोंबिवलीची आहे. डोंबिवलीत तिचं माहेर आहे. तितीक्षाने तिच्या युट्युब चॅनेलवरून तिच्या माहेरच्या घराची झलक दाखविली आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच लेक व जावई घरी आल्याने तितीक्षाच्या आई-बाबांनी दोघांचं अगदी जंगी स्वागत केलं.
यावेळी तितीक्षाने तिच्या माहेरच्या घराची झलक दाखविली. यावेळी तावडे कुटुंबाचे अंत्यंत साधे राहणीमान विशेष भावले. या तिच्या घरातील देवघराने आणि देवघराच्या स्वामींच्या प्रतिमेने लक्ष वेधलं. लिव्हींगरुममध्ये खुशबूच्या लग्नातील फोटो फ्रेम करून लावले आहेत. याशिवाय त्यांच्या एकत्र कुटुंबातील फोटोही फ्रेम करून लावल्या आहेत.या फोटोंमध्ये तावडे सिस्टर्सचे लहानपणीचे फोटो पाहायला मिळाले. शिवाय खुशबूच्या पहिल्या फोटोशूटचा फोटोही पाहायला मिळाला. तसेच तितीक्षा-खुशबूला मिळालेली पारितोषिकही लिव्हींगरुममध्ये ठेवण्यात आली. अत्यंत स्वच्छ व साध्या असं त्यांचं किचनही पाहायला मिळालं. तसेच त्याच्या बेडरूममध्येही काही फोटोफ्रेम लावून त्यांनी सजावट केली होती.