झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’, ‘पारू’, ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ यासह ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिकाही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले.
अशातच मालिकेच्या कथानकात आता आणखी नवीन वळण आले आहे. नुकत्याच झालेल्या भागात रुपालीला काही नागांनी येऊन पेटीच्या बाहेर काढले. यानंतर नेत्रा, अद्वैत व इंद्राणी फोनवर बोलत असताना तन्मय इंद्राणीला फोनवर कुठेतरी बाहेर चालत असतानाचे पाहायला मिळाले. त्याच्या पाठोपाठ शेखर राजाध्यक्षही चालताना दिसतो. त्यानंतर इंद्राणी तन्मयच्या पाठीवर हात लावते. इतक्यात शेखर इंद्राणीच्या तोंडावर रुमाल धरून तिला बेशुद्ध करतात आणि मग तिला कुठेतरी डांबून ठेवतात.
यानंतर डांबलेल्या ठिकाणी रुपाली व शेखर राजाध्यक्ष इंद्राणीला घेऊन जातात आणि मग रुपाली इंद्राणीच्या रक्ताने एक पत्र लिहून नेत्रा व अद्वैतला पाठवायचं ठरवतात. यानंतर मग शेखर एका तारेने इंद्राणीच्या बोटामधून रक्त काढतात आणि मग तिच्या रक्ताने लिहिलेले एक पत्र तन्मयला घेऊन नेत्रा व अद्वैतकडे पाठवतात.
यानंतर पुढील भागांत तन्मयने राजाध्यक्षांच्या घरात फाशी लावतानाचे पाहायला मिळाले आहे. मात्र इतक्यात अद्वैत त्याला येऊन वाचवतानाचेही पुढील भागात पाहायला मिळणर आहे. त्यामुळे आता तन्मयने घेतलेल्या फाशीमध्ये त्याचं जीव जाणार का? की अद्वैतमुळे त्याचा जीव वाचणार हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसेच इंद्राणीच्या रक्ताने पाठवेलेल्या पत्रामुळे नेत्रा-अद्वैत आता काय करणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.