शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपालीकडून अद्वैतनंतर आता नेत्रा-इंद्राणीच्या जीवाला धोका, मालिकेला नवं वळण, प्रेक्षकही चक्रावले

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2023 | 4:12 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
satvya mulichi satavi mulgi zee marathi serial new twist promo viral on social media

रुपालीकडून अद्वैतनंतर आता नेत्रा-इंद्राणीच्या जीवाला धोका, मालिकेला नवं वळण, प्रेक्षकही चक्रावले

छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत चालली आहे. मालिकेचे रहस्यमय कथानकच या मालिकेचे मुख्य आकर्षण आहे. या मालिकेत एकामागून एक येणारे ट्विस्ट या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहेत. अशातच आता मालिकेत आणखी एक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून यामुळे चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे. या नवीन प्रोमोमध्ये रुपालीकडून नेत्रा व इंद्राणी यांच्या जीवाला धोका असल्याचे कळत आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi New Promo)

नुकताच या मालिकेत रुपाली अद्वैतचं जीव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे  पाहायला मिळाले. या ट्विस्टमुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशातच आता आणखी एक झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमुळे मालिकेत येणाऱ्या नवीन ट्विस्टची झलक पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये, नेत्रा रूपालीला तुम्ही हे असं का केलंत असं विचारते. यावर रुपाली असं म्हणते की, “मला हे करांव लागलं. अद्वैत मला सर्पलिपी देत नव्हता, म्हणून मला त्याला मारावं लागलं.”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : बायकोची साडी नीट करत राहिला रोहित राऊत, पण व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना दिसले ५०० रुपये, म्हणाले, “नवऱ्याला…”

यापुढे रुपाली नेत्रा व इंद्राणीकडे संशयाने बघत असे म्हणते की, “परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत आहे का? तुम्ही दोघीसुद्धा मला सर्पलिपी देत नाही आहात. मी मला हव्या असलेल्या गोष्टीसाठी साम, दाम, दंड, भेद सगळं वापरते.” तसेच यापुढे ती “मृत्यूचं तांडव सुरु झालं आहे” असं म्हणत त्या दोघांना धमकीवजा इशाराही देते. रुपालीच्या अशा वागण्यामुळे नेत्रा, इंद्राणीसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे.

आणखी वाचा – Video : सलमान खानने अमिताभ बच्चन व अभिषेकला मारली मिठी, मात्र ऐश्वर्या रायवरुन रंगली जोरदार चर्चा, नेमकं काय घडलं?

दरम्यान, नुकत्याच एका प्रोमोमध्ये रूपालीने सर्पलिपीसाठी अद्वैतचा जीव घेतला असल्याचे पहायला मिळाले आहे. त्याचबरोबर अद्वैतला रुपालीचे सत्यदेखील माहीत झाले आहे. आणि आता ती नेत्रा व इंद्राणी यांनाही धमकी देते. त्यामुळे आगामी भागांत नेत्रा-इंद्राणी यांच्या जीवाला नेमका काय धोका आहे? रुपाली त्या दोघींचा जीव घेणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.   

Tags: entertainment newsmarathi entertainmentMarathi newsmarathi serialsatvya mulichi saatvi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan  Jewellery

Video : पुतळी हार, मंगळसूत्र अन्…; मुग्धा वैशंपायनने लग्नात परिधान केलेले दागिने होते फारच खास, नव्या नवरीचं खुललं सौंदर्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.