झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत गेले काही दिवस अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. विरोचकाने राजाध्यक्ष कुटूंबातील केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस या सर्वांना वश केले असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता तिच्या वशमधून हे सगळेच जण बाहेर आले आहेत आणि घरातील सर्व जण पाचव्या पेटीचा शोध घेत आहेत. त्यामुळे या पेटीच्या शोधात राजाध्यक्ष कुटुंबातील सर्वजण वावोशी गावाकडे निघाले आहेत. अशातच विरोचकही वावोशी गावाकडे गेला आहे. त्यामुळे नेत्रा नेत्राकडून विरोचकाचा अंत होणार का? याविषयी सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
अशातच गेल्या भागात शेखरने नेत्राकडून विरोचकाचा अंत होण्याचे संकेत देण्यात आले होते. अशातच आता या मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नेत्रा व इंद्राणी यांना पाचव्या पेटीचा शोध लागला असून त्यांना विरोचकाचा अंत ज्या शस्त्राने करायचा आहे, त्या शस्त्राचा शोधही लागला असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये नेत्रा “अस्तिकट्यार वापरूनच विरोचकाचा अंत होऊ शकतो” असं म्हणते. यावर इंद्राणी नेत्राला “पण ही अस्तिकट्यार आहे कुठे?” असं म्हणते.
यानंतर एका पेटीतून प्रकाश येतो व त्यातून अस्तिकट्यार दिसते. यावर नेत्रा ती कट्यार हातात घेते आणि त्या कट्टयारीकडे एकटक बघते. त्यामुळे आता या अस्तिकट्टयारने नेत्रा विरोचकाचा अंत करणार का? पेटीतून कट्टयार बाहेर येणे हा देवीआईचाच एक संकेत आहे का? या विषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
आणखी वाचा – शुक्रवारी मेष व कुंभसह ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, तुमच्यासाठी दिवस नेमका कसा?, जाणून घ्या…
त्यामुळे विरोचकाचा अंत नक्की नेत्राच्या हातून होणार की देवीआई विरोचकाचा अंत करणार?, पाचव्या पेटीत फक्त अस्तिकट्टयारचं आहे की यात आणखी काय दडलेलं असणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.