शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ओवसा, गणपतीसाठी कणकवलीमधील गावात नवरा व सासूला घेऊन गेली तितीक्षा तावडे, साधेपणा भावला, कोकणी स्टाइल उखाणाही चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 19, 2024 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde shared her special moments with husband Siddharth Bodke in Kokan Ganeshotsav

तितीक्षा तावडे ओवसापूजनसाठी पोहोचली कोकणात, पारंपरिक पद्धतीने केलं ओवसापूजन, साधपणाचे होतंय कौतुक

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा यावर्षी २६ फेब्रुवारी रोजी पार पडला. या दोघांच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. दोघे एकमेकांबरोबरचे खास क्षण  सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. तसंच अभिनेत्री तितीक्षाही तिच्या युट्यूब व्लॉगच्या माध्यमातूनही आयुष्यातील आही खास क्षण शेअर करत असते. अशातच तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यातून तिने कोकण सफारी घडवून आणली आहे. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Kokan Safar)

अभिनेत्री तितीक्षा तावडे ही कोकणातली आहे आणि कोकणात नवीन लग्न झालेली जोडप्यांचा लग्नानंतर ओवसा करण्याची पद्धत असते. याच ओवसासाठी ती नवरा सिद्धार्थबरोबर कोकणात गेली होती. या कोकण प्रवासाची झलक तिने  या युट्यूब व्हिडीओमधून दाखवली आहे. यात अभिनेत्रीने कोकण रेल्वेने प्रवास केला असून या प्रवासात त्यांना त्याबद्दल पाच तास उशीर झाला. या वेळेत दोघांनी रेल्वे स्टेशनवर केलेल्या मजामस्तीचीची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मुंबई ते कोकण प्रवास, कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव, ओवसा पूजन, देवदर्शन आणि कुटुंबियांबरोबरची मजामस्ती याचे खास क्षण तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरजचं डीपी दादाला उलट उत्तर, अंकिताची मध्यस्थी, म्हणाली, “त्यांना असं बोलू नको कारण…”

त्यानंतर सिद्धार्थ-तितीक्षा कणकवलीला पोहोचताच त्यांना आई-बाबा घेण्यासाठी पोहोचले. यानंतर दोघांनी गाडीने प्रवास करत घर गाठलं आणि अखेर गावच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी तितीक्षाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर तितीक्षाने तिचे ओवसा पूजनही केलं. या ओवसापूजनाची खास झलकही तितीक्षाने तिच्या या व्लॉगमधून दाखवली आहे. त्यानंतर तितीक्षाने नवऱ्याला तिच्या गावची भातशेती दाखवली. तितीक्षा तिच्या गावी दोन वर्षांनी गेली असून याबद्दलच्या आनंदी भावना तिने व्यक्त केल्या आहते.

आणखी वाचा – सूरज टॉप ५ मध्ये असणार?, Bigg Boss Marathi चे काम पाहणाऱ्या केदार शिंदेंचं भाष्य, म्हणाले, “वॉट्स येत आहेत ते पाहून…”

पुढे तितीक्षाने कोकणातील पारंपरिक पद्धतीने ओवसा पूजन केले आणि या सर्व पूजेची झलक तिने या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. यावेळी तितीक्षाने “गौरीपूजनाच्या दिवशी, बाप्पाच्या साक्षीने घेतला वसा, सिद्धार्थचे नाव घेते येवा कोकण आपलोच असा” असा खास उखाणाही घेतला. तर बायकोसाठी सिद्धार्थनेही “गणपती बाप्पाला नैवेद्य मोदकाचा, मोदकात घातला खवा, तितीक्षाचं नाव घेतो तिच्या घोवाला कोकण दाखवा” असा हटके उखाणा घेतला आहे. यानंतर तावडे कुटुंबियांनी सिद्धार्थ-तितीक्षाला ओवस्यांची देवाण-घेवाण केली आणि मग दोघांनी त्यांच्या गावचे देवदर्शन घेतलं. यानंतर घरातील साग्रसंगीत जेवणावर ताव मारत त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि परतीचा प्रवास केला.                

Tags: Kokan GaneshotsavTiteeksha Tawde Siddharth Bodke Kokan Owsa PoojanTiteeksha Tawde Siddharth Bodke Kokan Safar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
sankarshan karhade in doha

Video : कतारमध्ये आइस्क्रीमवाल्याकडूनच संकर्षण कऱ्हाडेची फजिती, स्वतःलाच काय करावं ते सूचेना अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.