शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अद्वैत-नेत्रामध्ये रोमान्स, अस्तिकाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर कोणाचा मृत्यू होणार?, प्रोमोने वाढवली उत्सुकता

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 1, 2024 | 6:13 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi new promo out see the details

Video : अद्वैत-नेत्रामध्ये रोमान्स, अस्तिकाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर कोणाचा मृत्यू होणार?, प्रोमोने वाढवली उत्सुकता

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेच्या रंजक कथानकाने या मालिकेला खऱ्या अर्थाने पसंती मिळत आहे. मालिकेची कथा व कथेत रोज नव्याने येणारे ट्विस्ट या मालिकेची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत. 

नुकताच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने ५०० भागांचा टप्पा ओलांडला.  प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला असून हा खास क्षण जोरदार साजरा करण्यात आला. याचे काही खास क्षण सोशल मीडियादवर पाहायला मिळाले. दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्रिनयना देवीचे गूढ रहस्य दाखवण्यात आले असून याद्वारे नेत्रा-अद्वैतच्या आयुष्याचा रंजक प्रवासही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकासह नेत्रा-अद्वैत यांच्यातील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना चांगलीच भावते.  

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – आलिशान घर, हॉलमध्येच कित्येक ट्रॉफी अन्…; इतकं मोठं व प्रशस्त आहे कार्तिकी गायकवाडचं घर, बेडरुमचीही दिसली झलक

अशातच या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा-अद्वैत यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. नेत्राला तिचं प्रेम परत मिळालं असं या व्हिडीओमध्ये म्हणण्यात आले असून नेत्राला आणखी एका सत्याचा उलगडा झाला असल्याचे समजत आहे. या व्हिडीओद्वारे नेत्राला रुपालीचं सत्य समजलं आहे की काय? असा प्रश्नही चाहत्यांना विचारण्यात आला आहे. 

आणखी वाचा – “आई तुझ्याकडेही दैवी शक्ती आहे का?”, ‘सातव्या मुलीची…’मधील इंद्राणीला तिच्याच लेकाने विचारला प्रश्न, म्हणाली, “तो सेटवर आला तेव्हा…”

या व्हिडीओमध्ये पुढे नेत्रा रुपालीचा मागून हात धरत तिच्या मानेवर धारदार शस्त्र ठेवत तिला “तुझा मृत्यू निश्चित आहे” असं म्हणते. त्यामुळे मालिकेला आता पुढे काय रंजक वळण मिळणार? नेत्रा रुपालीला मारणार का? तसेच नेत्रा-अद्वैतच्या आयुष्यात आता कजाय नवीन बदल होणार? हे आगामी भागांत पाहायला मिळेल. दरम्यान, या व्हिडीओखाली मालिकेच्या अनेक चाहत्यांनी त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आगामी भागांसाठीही उत्सुकता दर्शवली आहे.      

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
S.S. Rajamauli dance with wife

Video : भर कार्यक्रमात एस एस राजामौली यांचा पत्नीबरोबर भन्नाट डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.