‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस अधिकच रंजक होत आहे. मालिकेत नुकतंच विरोचकाने राजाध्यक्ष कुटूंबातील केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस या सर्वांना वश केले असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता तिच्या वशमधून हे सगळेच बाहेर आले आहेत आणि घरातील सर्व जण पाचव्या पेटीचा शोध घेत आहेत. त्यामुळे या पेटीच्या शोधात राजाध्यक्ष कुटुंबातील सर्वजण वावोशी गावाकडे निघाले आहेत.
विरोचकाला राजाध्यक्ष शोधत असलेल्या पाचव्या पेटीबद्दलही माहिती होत आहे. राजाध्यक्ष यांच्या घरी भविष्य सांगणारे येतात आणि ते देवीआईच्या कळसाबद्दल बोलत असतात. यावरून पाचवी पेटी देवीआईच्या त्या कळसात असण्याविषयीची माहिती विरोचकाला मिळते आणि ती त्या पेटीच्या शोधात वावोशी गावात पोहोचली आहे. अशातच नेत्राला विरोचक वावोशी गावकऱ्यांना व नेत्राच्या बाबांना काही इजा करेल की काय? अशी चिंता लागून राहिली आहे. विरोचकाला पाचवी पेटी मिळण्यापेक्षा विरोचकाने कुणाला काय करू नये यामुळे नेत्रा चिंतेत पडली आहे.
तर दुसरीकडे इंद्राणी व शेखर रुपालीच्या आधीच वावोशी गावात पोहोचले असतील असं म्हणताना दिसत आहेत. विरोचक वावोशी गावात गेल्यामुळे देवीआईनेच त्याला त्या गावात बोलावले असणार आणि देवीआई आता विरोचकाचा अंत करणार असं या प्रोमोद्वारे सुचवण्यात आले आहे. तसेच या प्रोमोमध्ये जशी शिकार जाळ्यामध्ये अडकते तसंच विरोचकही देवीआईच्या देवळाकडे स्वत:हुनच जात आहे” असं म्हणताना दिसत आहे.
त्यामुळे विरोचकाचा अंत नक्की नेत्राच्या हातून होणार की देवीआई विरोचकाचा अंत करणार?, आता रुपालीच्या वशीकरणाच्या शक्तीतून बाहेर आल्यानंतर राजाध्यक्ष कुटुंबियांना पाचव्या पेटीचा शोध लागणार का? यात नेमकं काय दडलेलं असणार? वावोशी गावात जाताच विरोचक नक्की काय करणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विरोचक वावोशी गावकऱ्यांना काही करणार की नाही? ही नेत्राची भीती खरी ठरेल का? याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.