शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘ठरलं तर मग’मधील साक्षी-चैतन्यचा सेटवर धिंगाणा, माधुरी दीक्षितच्या गाण्यावर भन्नाट डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 28, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Fame chaitanya and sakshi dance

Video : 'ठरलं तर मग'मधील साक्षी-चैतन्यचा सेटवर धिंगाणा, माधुरी दीक्षितच्या गाण्यावर भन्नाट डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. याशिवाय मालिकेतील पुर्णा आजी, कल्पना, प्रिया, प्रताप, अस्मिता, नागराज, चैतन्य, साक्षी हे कलाकारही त्यांच्या पात्रामुळे चर्चेत असतात. (Tharal Tar Fame chaitanya and sakshi dance)

मालिकेतील चैतन्य व साक्षी या पत्राचीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत चैतन्य साक्षीच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. साक्षीवरील प्रेमापोटी तो अर्जुन बरोबरची वर्षानुवर्षे असलेली मैत्रीही तोडतो. त्यानंतर साक्षी व चैतन्य साखरपुडा करतात. दरम्यान साखरपुडा होण्याआधीच अर्जुन व सायली चैतन्यचे डोळे उघडतात. साक्षी विरोधात पुरावे दाखवत तो चैतन्यला सावध करतात. मात्र साक्षीचा बदला घेण्यासाठी अर्जुन व सायली चैतन्यला साक्षीबरोबर साखरपुडा करण्याचा सल्ला देतात.

आणखी वाचा – Video : जुन्या पद्धतीचं घर, गायीचं दूधही काढलं अन्…; गावच्या मातीमध्ये रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Chaitanya Sardeshpande (@sarchaitanya)

एकूणच मालिकेत नकारात्मक भूमिकेत असलेली साक्षी ही भूमिका अभिनेत्री केतकी पालव साकारत आहे. तर चैतन्यच्या भूमिकेत अभिनेता चैतन्य सरदेशपांडे साकारत आहे. ऑनस्क्रीन साक्षी व चैतन्यच जस बॉण्डिंग आहे त्याहून वेगळं असं बॉण्डिंग त्यांचं ऑफस्क्रीन असलेलं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर चैतन्य व साक्षी म्हणजे चैतन्य व केतकीचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. अशातच दोघांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – ‘सुंदरा मनामध्ये…’ फेम समीर परांजपेची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमोने वेधलं लक्ष, प्रेक्षकांनीही केलं तोंडभरुन कौतुक

या व्हिडीओत चैतन्य व साक्षी शाहरुख खान व माधुरी दीक्षितच्या ‘ढोलना’ या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. ‘ढोलना’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. त्यानुसारच चैतन्य व साक्षीने डान्स केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. “चैतन्य तू खूप गोड आहेस”, “तुम्ही दोघं खूपच गोड आहे”, “कमाल”, “लयभारी”, अशा कमेंट करत दोघांचं भरभरुन कौतुक केलं आहे. चैतन्य व केतकीचा हा मजेशीर डान्स व्हिडीओ साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

Tags: entertainmentmarathi serialTharal Tar Fame chaitanya and sakshi dancetharal tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Anagha Atul shared some videos of her brother's wedding preparations through social media.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भावाची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या पारंपरिक विधींने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.