गुरूवार, जून 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘सातव्या मुलीची…’चे सीन खऱ्याखुऱ्या जंगलात कसे होतात शूट?, भर उन्हातही कलाकार घेत आहेत अशी मेहनत, BTS व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
मे 28, 2024 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Aishwarya Narkar and Shweta Mehandale shared Satvya Mulichi Satavi Mulgi serial BTS video

Video : 'सातव्या मुलीची...'चे सीन खऱ्याखुऱ्या जंगलात कसे होतात शूट?, भर उन्हातही कलाकार घेत आहेत अशी मेहनत, BTS व्हिडीओ समोर

पडद्यावर साकारणाऱ्या गोष्टींपेक्षा पडद्यामागील घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. अशातच मालिका हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकेबद्दल व त्या मालिकेच्या कलाकारांबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते मंडळी कायमच उत्सुक असतात. अशीच छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका.  

मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्य प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात. अशातच मालिकेतील इंद्राणी म्हणजेच अभिनेत्री श्वेता मेहंदळेने शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. श्वेताने मालिकेतील नुकत्याच शूट झालेल्या एका सीनच्या चित्रीकरणाच्या तयारीचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेची टीम जंगलात शूटिंग करतानाचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale)

आणखी वाचा – “घर घ्यायचं त्याच रात्री ठरवलं अन्…; नवीन घर घेतल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “चार वर्ष कष्ट…”

तसेच या सीनसाठी पडद्यामागील कलकारा एखादा महत्त्वाचा सीन पडद्यावर उत्तमरित्या साकारला जावा यासाठी किती मेहनत घेतात, हेदेखील दिसून येत आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेला एक व्हिडीओही सर्वनाचे लक्ष वेधून घेत आहे. नुकताच मालिकेत विरोचकाचा नदीतील एक सीन शूट झाला होता. यासाठी विरोचक नदीत उभे आसल्याचे पाहायला मिळाले. याच सीनच्या पडद्यामागची मेहनत ऐश्वर्या यांनी त्यांच्या या व्हिडीओद्वारे दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – सिंगापूरमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहण्यासाठी जमली तुफान गर्दी, वनिता खरातने दाखवली झलक, म्हणाली, “सार्थ अभिमान…”

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांच्या हाताला धरून काही माणसे नदी पार करताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये त्या नदीत जवळपास अर्ध्या डुबलेल्या दिसत आहेत. त्यामुळे एखाद्या सीनसाठी ऐश्वर्या यांनी केलेली मेहनत या व्हिडीओमधून दिसून येत आहे. ऐश्वर्या या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या अनेकदा मालिकेचे पडद्यामागील काही खास क्षण व्हिडीओद्वारे शेअर करत असतात. त्यामुळे या व्हिडीओमधील त्यांच्या मेहनतीसाठी चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. खूपच छान मालिका आहे, मालिकेच्या एका सीनसाठी किती मेहनत घेतली जाते हे यातून दिसून येत आहे” अशा अनेक कमेंट्स करत त्यांचे या सीनसाठी कौतुक केले आहे.

Tags: aishwarya narkarSatvya mulichi satavi mulgiShweta Mehandale
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

ghabadkund movie
Entertainment

थरार आणि रहस्याचा नवा अनुभव; ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता, कलाकारांचा दमदार अभिनय

जून 3, 2026 | 4:00 pm
 richa chadha on japan issue
Entertainment

“भिकारीपणा करु नका”, भारतीय महिलेने जपानमध्ये चोरी करताच सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “गर्दीत…”

जून 3, 2026 | 1:43 pm
 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Next Post
Pallavi Patil Home And Village

Video : जुन्या पद्धतीचं घर, गायीचं दूधही काढलं अन्…; गावच्या मातीमध्ये रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.