‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं आली आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर आता त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे दिसत आहे. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत आहे.
राजाध्यक्ष कुटुंबातील अद्वैत, नेत्रा व इंद्राणी या तिघांव्यतिरिक्त रुपालीने घरातील सर्वांनाच तिच्या बाजून वश केल्यामुळे देवीआईच्या लेकी हतबल झाल्या आहेत. त्यामुळे आता काय करावे? हे त्यांना काळात नाहीये. अशातच मालिकेच्या कथानकाची उत्कंठा वाढवणारा प्रोमो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला असून या प्रोमोद्वारे नेत्रा व इंद्राणी या देवीआईच्या लेकींना देवीकडून काही मदत मिळणार आहे की नाही? याविषयी संकेत दिला गेला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये भालबा नेत्राला एक पौराणिक दस्ताऐवज आणून देतात त्यामध्ये देवी आई मूर्च्छित पडल्याने तिला नेत्रा व इंद्राणी यांना काही मदत करता येणार नसल्याचे म्हटले आहे. भालबा नेत्राला दस्ताऐवज देतात, त्यामध्ये देवीआईचा काही संदेश लिहिला आहे, जो नेत्रा अद्वैत व इंद्राणी यांच्यासमोर वचून दाखवते आणि तिच्या या संदेशावरुन देवीआई मूर्च्छित पडल्याने तिला मदत करता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे आता मालिकेत नेत्रा व इंद्राणी देवीआईशिवाय विरोचकाचा वाढलेला प्रभाव कसा रोखणार? तसेच नेत्रा व इंद्राणी या देवीआईच्या लेकी राजाध्यक्ष कुटुंबियांना विरोचकाच्या तावडीतून कसं मुक्त करणार? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.