सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओद्वारे दिसली झलक, पूजाही करताना दिसली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 11, 2024 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivali Parab New Home

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओद्वारे दिसली झलक, पूजाही करताना दिसली अन्…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. अनेक कलाकारांना या रिऍलिटी शोने एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या कार्यक्रमाने त्याच्या विनोदी शैलीने जगभरात प्रेक्षकांची मन जिंकली. इतकंच नव्हेतर कार्यक्रमातील कलाकारांनी ही प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. कार्यक्रमातील कलाकारांचा खूप मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली कल्याणची चुलबुली अभिनेत्री शिवाली परब ही देखील नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. (Shivali Parab New Home)

सोशल मीडियावर ही शिवाली बऱ्यापैकी सक्रिय असते. काल शिवालीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर अनेक चाहत्यांसह कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. अशातच शिवालीने काही दिवसांपूर्वीच नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. शिवालीने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

आणखी वाचा – सायली-अर्जुनमध्ये दुरावा, प्रियाच्या हाती लागणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे?, साक्षीचीही धडपड सुरु

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

यावेळी शिवालीच्या नव्या घराची झलक पाहायला मिळते. इतकंच नव्हेतर शिवालीच्या या नव्या घरात गृहप्रवेशादरम्यान तिने पूजाही केलेली पाहायला मिळते. यावेळी शिवालीचा पारंपरिक अंदाजही प्रेक्षकांना विशेष भावला. शिवानीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि ती पूजेत मग्न झालेली पाहायला मिळाली. मनापासून अगदी पूजा करत शिवाली खूप आनंदात दिसत होती. याशिवाय यावेळी तिच्या जवळचे नातेवाईक व कुटुंबीय ही तिच्याबरोबर तिच्या या आनंदात सहभागी झाले होते.

आणखी वाचा – सूर्यकांतच्या धमकीला अहिल्यादेवी देणार प्रत्युत्तर?, पारू-आदित्यची प्रेमकहाणी होणार का सुरु?, नेमकं काय घडणार?

अखेर शिवालीने तिच्या वाढदिवसानिमित्त नव्या घरात गृहप्रवेश केला असल्याचं पाहायला मिळत आहे. आता शिवाली तिच्या नव्या घराची पहिली झलक प्रेक्षकांना केव्हा दाखवणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. @_youreflectioncanbeseen या इन्स्टाग्राम पेजवरून शिवालीच्या घरातील पूजेचा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे. एवढ्या कमी वयात स्वत:चं घर घेतल्यामुळे तिचं विशेष कौतुक केलं जात आहे.

Tags: entertainmentmarathi actressshivali parabShivali Parab New Home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Aishwarya Narkar Answers to Trollers

"चांगल्या मालिकेची माती केली आता…", मालिका बंद करण्यावरुन बोलणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांचं चोख उत्तर, म्हणाल्या, "मालिकेवर १०० कुटुंब…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.