पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कारने बाईकवरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया व अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. या कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या आजोबा, वडील व आईलाही अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील या कार अपघात प्रकरणी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे निषेध व्यक्त केला आहे. हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत आपापली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकरांनी यावर त्यांची कोणती प्रतिक्रिया न दिल्याबद्दल एका नेटकऱ्याने त्यांना या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा – “तब्येत खूपच बरी नसल्यामुळे…”, प्रथमेश परबच्या बायकोने पाहिला त्याचा नवा चित्रपट, “अक्षरशः डोळ्यातून पाणी…”
अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर ही जोडी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांच्या एका डान्स व्हिडीओवर एका नेटकऱ्याने त्यांना “पुण्यात दोन तरुण मुलेमुली धनदांडग्यांच्या गाडीखाली चिरडून ठार मारली. नाचण्याआधी थोडा खेद किंवा दु:ख तरी व्यक्त करा. षंढासारखे नुसते भिऊन नाचता काय थेरडड्यांनो?” असं म्हटलं आहे.
यावर अविनाश नारकरांनी या नेटकऱ्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. अविनाश यांनी नेटकऱ्याच्या या कमेंटला इन्स्टाग्राम स्टोरीवर मेन्शन करत “तुम्ही बोलण्यातली सभ्यता किमान जपा” असं म्हटलं आहे. दरम्यान, अविनाश नारकर हे त्यांच्या सोशल मीडियाद्वारे डान्स किंवा काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.

आणखी वाचा – मुलगी झाली हो! वरुण धवन व नताशा दलाल झाले आई-बाबा, कुटुंबामध्ये जोरदार सेलिब्रेशन
त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडीओखाली त्यांच्या चाहत्यांच्या चांगल्या-वाईट कमेंट्स असतात. त्यांचे काही चाहते त्यांना चांगल्या कमेंट्सद्वारे प्रोत्साहन देत असतात. तर काहीजण त्यांच्या डान्सवर नकारात्मक कमेंट्स करत त्यांना ट्रोल करत असतात. यापैकी काही ट्रोलर्सना अविनाश व ऐश्वर्या दोघेही कमेंट्स करत उत्तर देत असतात. अशातच त्यांच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.