शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर युद्धाला सुरुवात, विरोचकाविरुद्ध लढण्यासाठी नेत्राचे देवीआईला साकडं, राजाध्यक्ष कुटुंबाच्या मदतीला धावून येईल का त्रिनयना देवी?

Saurabh Moreby Saurabh More
मे 9, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi serial update Netra is praying to deviaai for fight against Virochak

अखेर युद्धाला सुरुवात, विरोचकाविरुद्ध लढण्यासाठी नेत्राचे देवीआईला साकडं, राजाध्यक्ष कुटुंबाच्या मदतीला धावून येईल का त्रिनयना देवी?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका गेल्या काही दिवसांपासून रंजक वळणावर आली आहे. मालिकेत रुपालीला विरोचकाने संमोहित करण्याची शक्ती मिळाली असल्याचे कथानक सुरु आहे. त्यामुळे रुपालीने तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीने राजाध्यक्ष कुटुंबातील सर्वांनाच संमोहित केले असल्याचे सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेतील हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलाच आवडत असून या ट्विस्टमध्ये आणखी पुढे काय होणार? याचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकतंच मालिकेत रुपालीने फाल्गुनी व केतकी काकू यांना संमोहित केल्यानंतर तिने शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केल्याचे पाहायला मिळत आहे. कालच्या भागात रुपाली तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीने तन्मय, तेजस, केतकी काकू, फाल्गुनी, शेखर या सर्वांना वश करुन नाचायला सांगते आणि घरतील ही सगळी मंडळी ‘झिंगाट’ या गाण्यावर नाचतानाचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील नेत्रा, अद्वैत कव इंद्राणी हे सोडून सर्वच जण रुपालीच्या संमोहित होण्याच्या शक्तीने तिच्या बाजूने वश झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – गजकेसरी योगासह शोभन योगामुळे धनु राशीसह ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार, कुणाला होणार आर्थिक फायदा?, जाणून घ्या… 

अशातच या मालिकेचा नुकतंच एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नेत्रा देवीआईसमोर आपलं गाऱ्हाणं मांडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नेत्रा देवी आईसमोर प्रार्थना करताना असं म्हणत आहे की, “सत्य की असत्य?, अर्थात विजय सत्याचाच होणार?” यापुढे नेत्रा देवीआईला उद्देशून “विरोचकाविरुद्धच्या या युद्धात आता तु माझ्याबरोबर आहेस की नाहीस?, मला नाही माहीत. पण या युद्धात मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. सत्यासाठी लढणार आहे. तुझं कार्य पूर्ण करण्याचा मीए प्रयत्न करत राहीन. आता हा माझा राग समज, नाहीतर निश्चय. पण मी आता तुला विचारणार नाही हे ठरवलं आहे.”

आणखी वाचा – गुलाबी टिकली, गुलाबी फ्रॉक अन्…; प्रसाद व मंजिरी ओक यांनी लाडक्या श्वानाचा केला नटापटा, ‘गुलाबी साडी’वरचा व्हिडीओ व्हायरल

त्यामुळे विरोचकाच्या शक्तीविरुद्धच्या लढाईत नेत्रा उतरली आहे. त्यामुळे विरोचकाविरुद्धचे हे युद्ध नेत्रा कसं लढणार?, या युद्धात तिला देवीआईची साथ मिळेल का? विरोचकाविरुद्धच्या या युद्धात नेत्राला यश मिळेल का? आणि राजाध्यक्ष कुटुंबियांना नेत्रा विरोचकाच्या शक्तीतून सोडवू शकेल का/ हे पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.      

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amol Naik New Serial

हिंदी मालिकेत ऋतुजा बागवेला मुख्य भूमिका, 'तुझ्यात जीव रंगला' फेम सुप्रसिद्ध अभिनेताही दिसणार, प्रोमो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.