रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपालीला विरोचकाकडून प्राप्त झाली नवी शक्ती, नेत्रा-अद्वैत विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध कसे लढणार?, मालिका रंजक वळणावर

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 20, 2024 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial new twist see the details

रुपालीला विरोचकाकडून प्राप्त झाली नवी शक्ती, नेत्रा-अद्वैत विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध कसे लढणार?, मालिका रंजक वळणावर

छोट्या पडद्यावरील सध्या चांगलीच चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे, खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे त्याचबरोबर कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका बघण्याचा प्रेक्षकांचा कल अधिकच वाढत आहे. सासू-सूनांच्या कुरघोड्या न् दाखवता एका त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्धावर या मालिकेचे कथानक आहे.

अशातच मालिकेत नेत्राने अस्तिकाचा अंत केला असल्याचे पाहायला मिळाले. अस्तिकानंतर नेत्राने विरोचकाचादेखील वध केला. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका प्रोमोमध्ये विरोचक अद्वैतचा गळा पकडत त्याला मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी नेत्रा विरोचकाचा वध करते. मात्र, यामुळे विरोचकाचा अंत होत नाही. यानंतर विरोचक पुन्हा जीवंत होते आणि तिला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ती दक्षिण दिशेकडे तिला बोलवणाऱ्या व्यक्तीच्या शोधात निघाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – “तुझा नवरा किती हॉट?”, प्रथमेश परबच्या बायकोला टॅग करत सुप्रसिद्ध अभिनेत्याची कमेंट, पार्टीमधील लूक चर्चेत

अशातच आता पुन्हा एकदा एका नवीन ट्विस्टमुळे मालिका एका रंजक वळणावर आली आहे. रुपालीला दक्षिण दिशेकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या आवाजाच्या दिशेने रुपाली चालत आहे. त्या दिशेने जात असतानाच रुपालीच्या हाती विरोचकाकडून एका वाद्याची खूण मिळते, जे दिसायला वीण्यासारखे आहे. मात्र या वीण्याला दोन तंबोरे आहेत आणि तेही उलट दिशेने. दरम्यान, या वाद्याचे वादन करुन रुपलीला एक शक्ती प्राप्त होणार आहे.  

आणखी वाचा – ‘या’ राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा, तर काही राशींसाठी आरोग्याचा धोका, जाणून घ्या तुमचा उद्याचा दिवस कसा असणार?

त्यामुळे आता या शक्तीचा वापर करुन रुपाली राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट आणणार? यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांसह नेत्रा-अद्वैत यांच्यावर काय परिणाम होणार? किंवा नेत्रा-अद्वैत विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध कसे लढणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक आगामी भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.      

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
dipika kakkar on second pregnancy

पहिल्या मुलाला वर्ष होण्यापूर्वीच दुसऱ्या गरोदरपणाची बातमी, दीपिका कक्करने सांगितलं सत्य, म्हणाली, "अल्लाहच्या मनात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.