शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डोळ्यांत पाणी, थकलेलं शरीर अन्…; सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नीची अशी अवस्था, प्रार्थना सभेचा व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 28, 2025 | 10:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
satish shah prayer meet

डोळ्यांत पाणी, थकलेलं शरीर अन्…; सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नीची अशी अवस्था, प्रार्थना सभेचा व्हिडीओ व्हायरल

satish shah prayer meet  : अभिनेते सतीश शाह यांचे तीन दिवसांपूर्वी म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण मनोरंजन जगताला मोठा धक्का बसला आहे. आपल्या अतुलनीय विनोदी आणि दिलदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याचे मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाले असल्याचं समोर आलं. सतीश यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्या मनोरंजनविश्वाला खूप मोठा धक्का बसला. इतकंच नाहीतर त्यांच्या चाहत्यांनाही हा धक्का न पचवता येणारा होता. ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘जाने भी दो यारो’ आणि ‘मैं हूँ ना’ या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला हा अभिनेता दीर्घकाळापासून किडनीशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते.

सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत त्यांच्या स्मरणार्थ जलाराम हॉल, जुहू, मुंबई येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम, सतीश शाह यांच्या पत्नी मधु शाह या प्रार्थना सभेचा भाग होण्यासाठी अश्रू डोळ्यांत घेऊन उपस्थित होत्या. दोन लोक पकडून त्यांना घेऊन आले होते. आणि यावेळी चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. गेले ५० वर्ष सतीश शाह आणि मधु शाह एकत्र होते. त्यांचा सुखाचा संसार सुरु होता मात्र सतीश यांच्या निधनाने त्यांचा हा प्रवास अर्धवट राहिला.

आणखी वाचा – प्रार्थना बेहेरेला पितृशोक, वडिलांचे अपघातात निधन, भावुक पोस्ट करत म्हणाली, “डोळ्यांतील पाणी…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला अनेक कलाकार उपस्थित होते. प्रथम आलेल्यांमध्ये सुमीत राघवन होते, जो आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्याव्यतिरिक्त, त्यांचे कुटुंब, जवळचे मित्र आणि सहकारी त्यांचे वैशिष्ट्य असलेल्या औदार्य, दयाळूपणा आणि विनोदबुद्धीला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले.

आणखी वाचा – तेजस्विनी लोणारीचा शाही थाटामाटात साखरपुडा समारंभ संपन्न, होणार शिवसेना नेत्याची सून, फोटो व्हायरल

रविवारी, त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि चित्रपट क्षेत्रातील लोक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत जमले होते. यावेळीही त्यांच्या पार्थिवाला पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

Tags: bollywood newssatish shahsatish shah death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Gangaram Gavankar Death

'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मालवणी मनाच्या नाटककाराने ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.