मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मालवणी मनाच्या नाटककाराने ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 28, 2025 | 11:24 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gangaram Gavankar Death

'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मालवणी मनाच्या नाटककाराने ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gangaram Gavankar Death : कोकणातील बोलीभाषेला कलात्मक रुप देण्यात हातखंड असलेले आणि मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य भाग म्हणजे अभिनेते गंगाराम गवाणकर. मराठी रंगभूमीवरील एक गाजलेलं नाव गंगाराम गवाणकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचं दहिसर (पूर्व) येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अशातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ अभिनेते गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वाने एक सर्जनशील, लोकभाषेचा प्रामाणिक पुरस्कर्ता गमावला आहे. मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची रांग लावण्यात गवाणकर यांचा मोठा हात होता. ‘वेडी माणसे’ हे त्यांचे पहिले नाटक होते. त्यानंतर ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ यांसारखी अनेक नाटके त्यांनी स्वतः लिहिली. ‘वात्रट मेले’ या नाटकाचे तब्बल दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले, तर ‘वन रुम किचन’ या नाटकाने हजारावर प्रयोगांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

आणखी वाचा – डोळ्यांत पाणी, थकलेलं शरीर अन्…; सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नीची अशी अवस्था, प्रार्थना सभेचा व्हिडीओ व्हायरल

मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेची प्रतिष्ठा वाढवण्यात वस्त्रहरण या नाटकाने महत्त्वाची भूमिका बजावली आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट घडवला. वस्त्रहरणचे तब्बल पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकाच्या लेखनाची जबाबदारी गंगाराम गवाणकर यांनी उत्तमरीत्या सांभाळली. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरील प्रवासाची सुरुवात ‘बॅकस्टेज’वरुन केली. त्याच काळात ते ‘एमटीएनएल’मध्ये नोकरी करत होते, पण नाट्यकलेवरील त्यांचे प्रेम त्यांना शांत बसू देत नव्हते. यावेळी अभिनय आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका त्यांनी बजावली.

Tags: entertainmentGangaram Gavankarmarathi writer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
satish shah prayer meet

सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नी होतेय ट्रोल, गळ्यातील मंगळसूत्र पाहून नेटकऱ्यांनी टोकलं, म्हणाले, "तिने अजूनही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.