शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुलीला पाहून ५,६ वेळा रडलो…”, मुलीला पहिल्यांदा पाहताक्षणी राहुल वैद्यची झाली होती ‘ही’ अवस्था, म्हणाला, “जेव्हा मी तिला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 22, 2023 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rahul Vaidya On His Daughter

"मुलीला पाहून ५,६ वेळा रडलो…", मुलीला पहिल्यांदा पाहताक्षणी राहुल वैद्यची झाली होती 'ही' अवस्था, म्हणाला, "जेव्हा मी तिला…"

प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री दिशा परमार व गायक राहुल वैद्य यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण, या जोडीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दिशाने एका मुलीला जन्म दिला असून गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी या जोडीने ही आनंदाची बातमी दिली आहे. राहुलने ही बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली असून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Rahul Vaidya On His Daughter)

एका मुलीचे वडील झाल्यानंतर गायक राहुल वैद्यने सांगितले की, “जेव्हा त्याने आपल्या मुलीला पाहिले तेव्हापासून तो पाच सहा वेळा रडला आहे”. तो म्हणाला, “ही भावना पूर्णपणे वेगळी आहे. मुलीचा जन्म अत्यंत शुभ मुहूर्तावर झाला. गणेशजींसोबत लक्ष्मी आमच्या घरी आली आहे. दिशा आणि आमची मुलगी दोघेही ठीक आहेत.”

राहुल पुढे म्हणाला, “जेव्हाही मी तिच्याकडे पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात. त्यावेळी बोलत असतानाही मी गुदमरून जातो, मला खूप बरं वाटतं. आपल्याला माहित असते की बाळ लवकरच होणार आहे. पण जेव्हा ते प्रत्यक्षात घडते, ती एक वेगळी भावना असते.”

आणखी वाचा – राहुल वैद्य व दिशा परमारच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी

राहुलला अजूनही विश्वास बसत नाही आहे की, तो बाप झाला आहे. याबाबत बोलताना राहुल म्हणाला, “मला अजूनही विश्वास बसत नाही की, आता मला मुलगी आहे आणि मी वडील आहे. जेव्हा मी फॉर्मवर सही करत होतो तेव्हा ‘वडिलांचे नाव’ असे लिहिले होते, त्या क्षणी मला वाटले की, शेवटी हा आनंद ही माझ्या वाटेल आला आहे.”

आणखी वाचा – “कंटाळून त्यांनी आत्महत्या…”, तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप, म्हणाली, “राखीला मानसिक…”

उद्या म्हणजेच २३ सप्टेंबरला राहुल वैद्यचा वाढदिवस आहे. यावेळी तो म्हणाला, “या वर्षीचा माझ्यासाठी हा सर्वात अविस्मरणीय वाढदिवस असेल, कारण दिशा व माझ्या मुलीला एकाच दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या मुलीचे घरी स्वागत करणार आहे.”

Tags: disha parmarentertainmentrahul vaidyaRahul Vaidya and Disha Parmar blessed with Baby Girl
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा व राघव चड्ढाच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर, पाहुण्यांना 'ही' गोष्ट वापरण्याची आहे मुभा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.