मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ढाल व तलवार हाती घेऊन संतोष जुवेकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, “हिंदवी स्वराज्यासाठी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 3, 2023 | 6:44 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
santosh juvekar viral video

santosh juvekar viral video

प्रत्येक कलाकार चित्रपटात काम करण्यासाठी बरीच मेहनत करतात. पण तोच जर ऐतिहासिक चित्रपट असेल, तर त्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सरावाला प्रचंड महत्व आहे. त्यामुळे त्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी कलाकार कठोर प्रशिक्षण घेत असतात. घोडेस्वारी, तिरंदाजी व अन्य कौशल्ये तसेच चित्रपटात वापरली जाणारी बोलीभाषा आणि शैली या सर्व गोष्टी चित्रपटातील कलाकारांना शिकवल्या जातात. त्या पात्रांच्या भूमिकेत खरे उतरण्यासाठी कलाकार कोणतीही कसर सोडत नाहीत.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर नेहमीच वैविध्यपूर्ण कलाकृतींमध्ये झळकतो. त्याची झलक त्याच्या अनेक भूमिकांमधून आपल्याला पाहायला मिळाली. अनेक मराठी चित्रपट करणारा संतोष आता अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ या ऐतिहासिक हिंदी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील त्याची भूमिका अद्याप समोर आली नसून त्या भूमिकेसाठी मात्र संतोष जुवेकर कठोर प्रशिक्षण घेताना दिसत आहे. (santosh juvekar viral video)

संतोष जुवेकरचा ‘हा’ व्हिडिओ येतोय चर्चेत (santosh juvekar viral video)

अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो ढाल व तलवार हाती घेत तलवारबाजीचा सराव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना संतोषने लिहिलंय, “तालमीला सुरवात केली आणि पुढच्या २० मिनिटात दमून घामाच्या धरा सुरु झाल्या. तेही लाकडाची तलवार आणि अगदीच तालमीसाठी वापरायची ढाल घेऊन. तेव्हा खरंच पुन्हा एकदा जाणीव झाली ती चार ते पाच किलोची तलवार आणि ती ढाल घेऊन माझे मावळे दिवसभर अगदी सूर्यास्तापर्यंत न थांबता तेवढ्याच ताकतीने कसे लढले असतील. नुस्ता विचार केला तरी थरकाप उडतो.”

“आज जेव्हा तालमीला जातो तेव्हा ती लाकडी तलवार हातात घेतल्यावर जे काही वाटत असेल ते नाही शब्दात सांगू शकत ते अनुभवायलाच हवं. आपल्या राजाच्या आदेशावरून त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्यात आणि निधड्या छातीनं आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी लढण्यात जी नशा आणि जी ताकत होती ती माझ्या त्या शिवरायांच्या मावळ्यालाच ठाऊक. धन्य ती जिजाऊ, धन्य ते शिवराय आणि धन्य तो माझा प्रत्येक मर्द मराठा मावळा त्रिवार मुजरा समद्यास्नी. ह्या माझ्या मावळ्यांच्या आशीर्वादानेच ह्या माझ्या मावळ्यांच्या चरणी एक पुष्प अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. आशिर्वाद आणि साथ असूदे रे महाराजा” (santosh juvekar viral video)

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

अभिनेता संतोष जुवेकरने ‘फक्त लढा म्हणा’, ‘रेगे’, ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘रावरंभा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच संतोषचा ‘डेट भेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हेमंत ढोमेही दिसले आहेत. (santosh juvekar)

हे देखील वाचा : विशाखा सुभेदार अभिनयक्षेत्रात येण्याआधी विकायची लोकल ट्रेनमध्ये ड्रेस, म्हणालेली, “नोकरी करत होती तेव्हा…”

Tags: santosh juvekartrendingviral video
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
gashmeer mahajani on nitin desai death

नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर टीका करणाऱ्यांवर भडकला गश्मीर महाजनी, म्हणाला, “तुम्ही काहीही बरळता अन्...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.