रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“विमान कोसळलं आणि…”, अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या ‘त्या’ प्रवासाने सांगितली खरी परिस्थिती, म्हणाला, “मीही मरणार होतो पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2025 | 4:00 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Ahmedabad Plane Crash

"विमान कोसळलं आणि…", अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या 'त्या' प्रवासाने सांगितली खरी परिस्थिती, म्हणाला, "मीही मरणार होतो पण…"

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने मन सुन्न केलं. अहमदाबाद येथून लंडनला जाणारे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच खाली कोसळले आणि मोठा स्फोटही झाला. या अपघातात २४२ च्या आसपास पायलट, इतर कर्मचारी आणि प्रवासी होते. या अपघातात केवळ एक प्रवासी बचावला आहे. काळ आला होता पण तो बचावला. मृत्यूच्या दाढेतून तो परतला. हो. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश हे या अपघातातून बचावले आहेत. हा चमत्कार नेमका कसा घडला?, ते विमानातून बाहेर कसे आले?, असे अनेक प्रश्न पडले आहेत. हो. या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः विश्वासकुमार रमेश यांनी दिली आहेत.

डीडी न्यूजशी बोलताना आणि डॉक्टरांशी बोलताना विश्वासकुमार म्हणाले की, “विमान अपघातामधून मी जिवंत कसा वाचलो, यावर माझाही विश्वास बसत नाही आहे. काही क्षणासाठी मला वाटले होते की, मीही मरणार, पण अपघातानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी जिवंत होतो. मग मी सीटबेल्ट काढून तिथून दूर गेलो. विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमान वसतिगृहाच्या इमारतीला जाऊन आदळले होते. मी जिथे बसलो होतो, तो भाग आधीच जमिनीवर पडला”.

आणखी वाचा – तीन दिवसांपूर्वीच करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीला स्वतःच्या मृत्यूबाबत माहित होतं?, ‘ती’ पोस्ट व्हायरल

पुढे ते म्हणाले, “माझ्या बाजूला एक्झिट डोअर होता, त्यामुळे मी तिथून बाहेर पडलो. पण माझ्या विरुद्ध बाजूला एक भिंत असल्यामुळे तिथल्या लोकांना विमानातून बाहेर पडणे शक्य झाले नसावे. मी बाहेर पडल्यानंतर विमानाचा स्फोट झाला. माझ्या नजरेसमोरच दोन एअर होस्टेस आणि एक वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाला”. विश्वासकुमार यांना विश्वास बसत नव्हता की एवढ्या मोठा अपघातातून ते बचावले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विश्वासकुमार यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर जखमा दिसत आहेत. दरम्यान, ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आणखी वाचा – Video : करिष्मा कपूरच्या लग्नात करीनाचा नखरा, नवरीसारखा डोक्यावरुन पदर घेतलेला आणि…; लूक पाहून चाहते हैराण

रुग्णालयात पोहोचल्यानंतर विश्वासकुमार रमेश यांनी डॉक्टरांना सांगितले की, “विमानाच्या उडाणानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमान जिथून तुटले, तिथेच ११ए या सीटवर मी बसलेलो. विमान तुटल्यानंतर सीटजवळच एक्झिट डोअर होता. त्यातून वेळीच बाहेर पडल्यामुळे विमानाला झालेल्या स्फोटातून मी वाचलो. मी विमानातून उडी मारली नव्हती. तर माझ्या सीटसह मी फेकला गेलो. मी जिथे पडलो, ती जागा सपाट होती. मी सीट बेल्ट काढला आणि आजूबाजूला नजर टाकली. जमिनीवरच असल्यामुळे मी एक्झिट डोअरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि मी बाहेर आलो”.

Tags: ahmedabad plane crashahmedabad sad newsplane crash
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Ankita Walawalkar on Air India

"स्क्रीनची, जेवणाची अवस्था…", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर कोकण हार्टेड गर्लने दाखवली वस्तुस्थिती, एअर इंडियाची पोलखोल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.