हल्ली मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक पुन्हा फिरताना दिसतोय. रंगभूमीवर रंगणाऱ्या नाटकांना प्रेक्षक पून्हा एकदा भरभरून प्रेम देताना दिसत आहेतच. रसिकजणांचं असच प्रेम लाभलेलं रंगभूमीवरील सुंदर नाटक म्हणजे ’संगीत देवबाभळी’. २२ डिसेंबर २०१७ रोजी रंगभूमीवर अवतरलेल्या नाटकाने इतिहास रचत सर्वाधिक ४४ पुरस्कार मिळालेलं हे एकमेव व्यावसायिक नाटक होण्याचा बहुमान मिळवला. मराठी साहित्यातील संगीत नाटक लोकप्रिय प्रकार जनमनात रुजवण्याचा संकल्प करून तब्बल पाच वर्ष या नाटकातील मंडळींनी समाज प्रबोधन केलं. परंतु या नाटकाबाबत एक महत्वाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवली जात आहे.(sangeet devbabhali)
====
हे देखील वाचा- पुन्हा एकदा प्रेमात पाडायला येतोय ‘दोन कटींग’ भाग ३
====
अभिजात मराठी भाषेचं लेणं, स्त्रीवाद, भक्तीरसातला द्वैताद्वैत , संत परंपरा, लोकपरंपरेतलं संगीत-अभंग आणि मराठमोळी संस्कृती ह्या सगळ्यांनी ओतप्रोत असलेलं हे नवं संगीत नाटक ताज्या दमाच्या कलावंतांनी रंगभूमीवर आणलं. स्व.मच्छिंद्र कांबळी आणि त्यांच्यानंतर प्रसाद कांबळी यांच्याद्वारे ‘भद्रकाली’ कडून मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगळ्या आशयाचे दर्जेदार नाटकं आणली गेली.
मराठी साहित्यातील गरुड हा लोकप्रिय प्रकार जनमनात रुजवण्याचा संकल्प करून तब्बल पाच वर्ष या नाटकातील मंडळींनी समाज प्रबोधन केलं. परंतु या नाटकाबाबत एक महत्वाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवली जात आहे.

पत्रकार परिषद आयोजित करत कांबळी यांनी ही माहिती दिली की भरभरून प्रेम मिळाल्या नंतर आम्ही आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. नाटक थांबवण्याचा निर्णय घेतल्या नंतर ‘आमच्या भागात आल्याशिवाय तुम्ही नाटक कस थांबवू शकता? अशा तक्र्रारी काही रसिक प्रेक्षकांकडून येऊ लागल्या मुळे आम्ही ९ मार्च ते १९ मार्च हे नाटक विविध भागांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.(sangeet devbabhali)
‘देवबाभळी दिंडी – धावा जनामनाचा…’ म्हणत आम्ही नाटकांचे हे अंतिम प्रयोग विदर्भापासून सुरु होणार आहेत. नागपूर, आनंदवन, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, लातूर, बीड , औरंगाबाद, जळगाव, नाशिक अशा पद्धतीने हा धावा जनामनाचा दौरा असेल.
====
हे देखील वाचा- बायोपिक म्हणजे सुबोध भावेच इतिहासातील एका महत्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारणार सुबोध
====
पुढचा धावा कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र अशा इतर जिथे मराठी भाषा आणि मराठी मनं असतील तिथंही हा प्रयोग चालवण्यात येणार असल्याची माहिती कांबळी यांनी दिली. पांडुरंगाच्या वारी प्रमाणं देवभाबळी दिंडी सुद्दा पांडुरंगाच्या पायी अवतरलेल्या चंद्रभागेत अखेरचं स्नान करून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.(sangeet devbabhali)