पंढरीच्या विठुराया चरणी तल्लीन होणार ‘देवबाभळी दिंडी–धावा जनामनाचा…

sangeet devbabhali
sangeet devbabhali

हल्ली मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक पुन्हा फिरताना दिसतोय. रंगभूमीवर रंगणाऱ्या नाटकांना प्रेक्षक पून्हा एकदा भरभरून प्रेम देताना दिसत आहेतच. रसिकजणांचं असच प्रेम लाभलेलं रंगभूमीवरील सुंदर नाटक म्हणजे ​’संगीत देवबाभळी’. २२ डिसेंबर २०१७ रोजी रंगभूमीवर अवतरलेल्या नाटकाने इतिहास रचत सर्वाधिक ४४ पुरस्कार मिळालेलं हे एकमेव व्यावसायिक नाटक होण्याचा बहुमान मिळवला. मराठी साहित्यातील संगीत नाटक लोकप्रिय प्रकार जनमनात रुजवण्याचा संकल्प करून तब्बल पाच वर्ष या नाटकातील मंडळींनी समाज प्रबोधन केलं. परंतु या नाटकाबाबत एक महत्वाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवली जात आहे.(sangeet devbabhali)

====

हे देखील वाचा- पुन्हा एकदा प्रेमात पाडायला येतोय ‘दोन कटींग’ भाग ३

====

अभिजात मराठी भाषेचं लेणं, स्त्रीवाद, भक्तीरसातला द्वैताद्वैत , संत परंपरा, लोकपरंपरेतलं संगीत-अभंग आणि मराठमोळी संस्कृती ह्या सगळ्यांनी ओतप्रोत असलेलं हे नवं संगीत नाटक ताज्या दमाच्या कलावंतांनी रंगभूमीवर आणलं. स्व.मच्छिंद्र कांबळी आणि त्यांच्यानंतर प्रसाद कांबळी यांच्याद्वारे ‘भद्रकाली’ कडून मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगळ्या आशयाचे दर्जेदार नाटकं आणली गेली.

मराठी साहित्यातील गरुड हा लोकप्रिय प्रकार जनमनात रुजवण्याचा संकल्प करून तब्बल पाच वर्ष या नाटकातील मंडळींनी समाज प्रबोधन केलं. परंतु या नाटकाबाबत एक महत्वाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवली जात आहे.

devbhabali

पत्रकार परिषद आयोजित करत कांबळी यांनी ही माहिती दिली की भरभरून प्रेम मिळाल्या नंतर आम्ही आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. नाटक थांबवण्याचा निर्णय घेतल्या नंतर ‘आमच्या भागात आल्याशिवाय तुम्ही नाटक कस थांबवू शकता? अशा तक्र्रारी काही रसिक प्रेक्षकांकडून येऊ लागल्या मुळे आम्ही ९ मार्च ते १९ मार्च हे नाटक विविध भागांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.(sangeet devbabhali)

‘देवबाभळी दिंडी – धावा जनामनाचा…’ म्हणत आम्ही नाटकांचे हे अंतिम प्रयोग विदर्भापासून सुरु होणार आहेत. नागपूर, आनंदवन, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, लातूर, बीड , औरंगाबाद, जळगाव, नाशिक अशा पद्धतीने हा धावा जनामनाचा दौरा असेल.

====

हे देखील वाचा- बायोपिक म्हणजे सुबोध भावेच इतिहासातील एका महत्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारणार सुबोध

====

​पुढचा धावा कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र अशा इतर जिथे मराठी भाषा आणि मराठी मनं असतील तिथंही हा प्रयोग चालवण्यात येणार असल्याची माहिती कांबळी यांनी दिली. पांडुरंगाच्या वारी प्रमाणं देवभाबळी दिंडी सुद्दा पांडुरंगाच्या पायी अवतरलेल्या चंद्रभागेत अखेरचं स्नान करून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.(sangeet devbabhali)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
umesh kamat priya bapat
Read More

या कारणामुळे रद्द झाले दादा एक गुडन्यूजचे प्रयोग

मराठी रंगभूमीवर दादा एक गुडन्यूज या नाटकाने हाऊसफुल्लचा बोर्ड फाडला. या नाटकांचे प्रयोग दणक्यात सुरु असताना मात्र या…
Sankarshan Karhade fan moment
Read More

‘खाउ साठी हे ५०० रूपये घे..’ प्रयोग पाहून सुखावलेल्या प्रेक्षकाची संकर्षणला अनोखी भेट

रुपेरी पडदा असो व रंगमंच संकर्षणच्या अभिनयाचं पारडं नेहमी जड असतं. अभिनयासोबतच एखाद्या विषयावर तेवढच परखड मत असणं…
Sankarshan Karhade post viral
Read More

3 Idiots मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी

सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर अनेक कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील…
amruta deshmukh prashant damle
Read More

पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुखचा नवीन प्रोजेक्ट. मित्र प्रसाद जवादेनेही पोस्ट करत दिल्या शुभेच्छा

‘बिग बॉस मराठी ४’ च्या घरातील साऱ्याच स्पर्धकांनी आपापली वेगळी ओळख बनवली. दरम्यान या स्पर्धकांपैकी अनपेक्षित पणे घराबाहेर…
sankarshan karhade new drama
Read More

रंगभूमीवर लागू होणार ‘नियम व अटी’! संकर्षण कऱ्हाडे लिखित नवीन नाटकाची घोषणा

मराठी माणसाच्या आवडी निवडीत एक आवड अशी आहे जी प्रत्येक मराठी माणसाच्या कुठे ना कुठे भाग बनते ती…
Prashant damle
Read More

अभिमानस्पद! नाटककार प्रशांत दामले यांचा ‘या’ मानाच्या पुरस्काराने गौरव

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती अथवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली…