कलाकार हा कधी कधी त्याच्या कले व्यतिरिक्त, कामा व्यतिरिक्त त्याच्या काही कृत्यांमुळे लोकांना अधिक भावतो. कलाकाराची अभिनया व्यतिरिक्त ही बाजू प्रेक्षकांना क्वचितच पाहायला मिळते. कलाकाराच्या सहजतेची अशीच एक बाजू प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळते. नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आघाडीचा अभिनेता म्हणजे संदीप पाठक. यापूर्वी संदीपच्या प्रेक्षकांशी अगदी सहजरित्या वागण्याचे व्हिडिओ आपण पहिले आहेत. त्याच्या या सामंज्यस्याचे आणखी एक प्रात्यक्षिक काल पाहायला मिळाले.(sandeep pathak)
हे देखील वाचा – हेमांगीची ‘पठाण’ बद्दल पोस्ट आणि चाहत्यांची नाराजी…
संदिप ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये संदिप शूटिंग साठी एका ठिकाणी जात असताना रस्त्यात एक आजी चालताना दिसते. पुढे जाण्यासाठी आजी संदीपच्या गाडीला हात करते आणि संदिप त्यांना गाडीत बसवतो ही. आजीला हव्या असणाऱ्या ठिकाणी संदीप त्यांना पोहोचवतो आणि त्यांना नंतर आजीना उतरवताना संदीप म्हणाला रस्त्यात भेटलेल्या या आजींना हवं त्या ठिकाणी पोहचवल आणि आज गाडी घेतल्याचं चीज झालं. संदीपचा स्वभाव पाहून म्हणाल्या ‘ मला माझ्या लेकाची आठवण आली’.(sandeep pathak)

संदीप ने या पोस्टला “शुटींग ला जात असताना ही गोड आजी भेटली, प्रवासात तिच्यासोबत गप्पा झाल्या आणि आजीचे आशिर्वाद मिळाले. अजून काय हवं……… ” असं सुंदर कॅप्शन दिलं आहे. तर संदीपच्या या व्हिडिओ वर चाहत्यांनी ‘कलाकारांनी एक वेळी चित्रपटात काम चांगल नाही केल तरी चालेल पण.. पण खऱ्या आयुष्यामध्ये चांगलं काम केल पाहिजे.. काही कलाकार चित्रपट केल्या नंतर घमंडी होतात.. पण तुमचा स्वभाव त्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे…❤️ आयुष्यात दोन पैसे कमी कमवा पण माणुसकी विसरू नका..????✌️ तुमच्या या कामगिरीला माझा ????सलाम….’ , ‘खुप चांगले काम केलत तुम्ही पाठक सर .. बाकी आजी ला सेलू ला सोडल्या बद्दल सेलुकरांकडून तुमचे खुप खुप आभार ????’ अशा कमेंट्स करत संदीपच्या या सहजतेचे कौतुक केले आहे. तर कलाकारांनी सुद्धा संदीप साठी कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत.(sandeep pathak)