मनोरंजन सृष्टीचा इतिहास पाहिला तर काही असे सिनेमे आहेत जे पाहताना कधीच जुने वाटत नाहीत उदाहरणार्थ जत्रा, अगं बाई अरेच्चा, श्रीमंत दामोदर पंत, गलगले निघाले असे अनेक चित्रपट हास्य निर्मिती करून प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. या चित्रपटांच्या निर्मितीत भक्कमपणे उभे असणारे दिगदर्शक, अभिनेते केदार शिंदे लवकरच ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.(shahir sable)
हे देखील वाचा- ‘अपघातात मुलगा गेला पण तुझ्या रूपात पुन्हा मिळाला’ संदीपचं प्रेम पाहून प्रवासात भेटलेल्या आजी भावूक
‘महाराष्ट्र शाहीर’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या शाहीर साबळे यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळात घेण्यात आला आहे. कविवर्य राजा बडे यांनी लिहिलेल्या, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि शाहीर यांच्या तडफदार आवाजत गायलेल्या या गाण्यातील दोन चरणे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहेत. तर १. ४१ मिनिट हा राज्यगीताचा अवधी असणार आहे.(shahir sable)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून या हे राजयगीत आचरणात आणलं जाणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं असून सिनेमाची पुढील प्रोसेस सुरू झाली आहे. दिगदर्शक, अभिनेते केदार शिंदे लवकरच ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी शाहिर साबळेंची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत स्वत: केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे झळकणार आहे.(shahir sable)