Mawra Hocane marriage : बॉलिवूडचा सनम तरी कसम’ हा लोकप्रिय चित्रपट सर्वांना माहीतच असेल. अनेक प्रेमी युगुलांसाठी हा चित्रपट म्हणजे प्रेमाचा विषय आहे. याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजे मावरा होकेन. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. याच अभिनेत्रीबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे ती म्हणजे मावरा होकेन नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मागील अनेक दिवसांपासून मावराच्या अफेअरच्या व लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर तिने स्वतः फोटो पोस्ट करून लग्नाची माहिती दिली आहे. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमीर गिलानीबरोबर तिने लग्नगाठ बांधली. (Mawra Hocane marriage)
मावराने बुधवारी तिच्या निकाहचे रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. मावरा व अमीर यांनी रोमँटिक पोज देत फोटो काढले. तिच्या लग्नाचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “आणि या सर्व गोंधळातही मी तुला शोधले. बिस्मिल्लाह”. मावरा व अमीरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे आणि दोघांना त्यांच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाबद्दल शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
मावरा आणि अमीर यापूर्वी सबात’ आणि ‘नीम’ सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन ड्रामामध्ये एकत्र झळकले होते. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहीर कबुली दिली नव्हती. पण अनेक कार्यक्रमांना ते दोघे एकत्र हजेरी लावायचे. तसेच सोशल मीडियावरही एकमेकांबद्दल पोस्ट करायचे, त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा कायम होत असत आणि अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. दोघांनीही लग्न करुन आपल्या नात्यावर अखेरचं शिक्कामोर्तब केलं आहे.
दरम्यान, मावराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने हर्षवर्धन राणेबरोबर ‘सनम तेरी कसम’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या एका चित्रपटामुळे आणि तिच्या अभिनयामुळे तिने भारतात प्रचंड मोठा चाहतावर्ग बनवला. २०१६ मध्ये आलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांवरील जादू आजही लोकांच्या मनात कायम आहे. येत्या व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने ७ फेब्रुवारीला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.