सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भांडी घासली, बेसिनही साफ केलं अन्…”, ‘केबीसी’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “बाथरुमचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 16, 2023 | 2:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amitabh Bachchan On cleaned washbasins

"भांडी घासली, बेसिनही साफ केलं अन्…", 'केबीसी'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाले, "बाथरुमचं…"

मेगास्टार अमिताभ बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी कौन बनेगा करोडपती १५ मध्ये केलेल्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अमिताभ बच्चन यांचा कठीण काळ सर्वांनाच माहित आहे. अगदी कठीण परिस्थितींचा सामना करून अमिताभ यांनी अभिनयाच्या जोरावर स्वतःच असं विश्व निर्माण केलं आहे. अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नसताना त्यांना बरीच मजुरीची काम करावी लागली. (Amitabh Bachchan On cleaned washbasins)

याबाबत बोलताना अमिताभ बच्चन यांनी भांडी घासली तसेच बाथरूमचे बेसिनही साफ केले असल्याचे स्वतः सांगितले. ‘कौन बनेगा करोडपती १५’ मध्ये एका स्पर्धकासह संवाद साधत असताना अमिताभ यांनी सांगितले की, मी कधी घरात काम केलं याचा कोणी विचारही केला नसेल. स्पर्धक हर्ष शाहने अमिताभ यांना असाही प्रश्न केला की, तुम्ही काय काम केलं आहे, त्याने असाही प्रश्न केला की त्यांनी कधी भांडी घासली आहेत का? स्पर्धक म्हणाला, ‘मी वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. आमच्याकडे असणाऱ्या यंत्राचा वापर करून आम्ही सफाईदार स्क्रब बनवतो. सर, तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?’

आणखी वाचा – स्वामींची मुर्ती, अँटिक वस्तू, पारंपरिक टच अन्…; आतून असं आहे तेजस्विनी पंडितचं आलिशान घर, फोटो समोर

अमिताभ बच्चन यांनी यावर उत्तर देत असं म्हटलं की, “हो सर. मी कितीतरी वेळा भांडी घासली आहेत. स्वयंपाकघराचं बेसिनही साफ केलं आहे. इतकंच नव्हे तर बाथरूमचं बेसिनही साफ केलं आहे. तुम्हाला असं का वाटतंय की, मी अशी काम केली नाहीत”. स्पर्धकाने केलेल्या प्रश्नाला अमिताभ बच्चन यांनी न जुमानता उत्तर दिलं.

आणखी वाचा – नवऱ्याने ५०वं शतक झळकावल्यानंतर अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, पोस्ट शेअर करत म्हणाली, “तू देवाचा…

अमिताभ सध्या चित्रीकरणामध्ये प्रचंड व्यग्र आहेत. टाइगर श्रॉफ व क्रिती सेनन यांच्यासह ‘गणपत’ या चित्रपटात ते दिसले होते. यानंतर आता ते दीपिका पादुकोण, कमल हसन, प्रभास यांच्या ‘कल्कि २८९८ ईडी’ चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय रजनीकांतबरोबर ते ‘थलाइवर 170’ ‍या चित्रपटातही झळकणार आहेत.

Tags: amitabh bachchanAmitabh Bachchan on KBCbollywood actorentertainmentkaun banega crorepati 15
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Mahesh Manjrekar requests Marathi films dubbed in Hindi

"नालायक चित्रपट बघतोच मग…", मराठी चित्रपटांना प्रेक्षकच नाही पाहून भडकले महेश मांजरेकर, म्हणाले "आता हिंदीत डब करा कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.