बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व अभिनेता सलमान खान ही जोडी ९०च्या दशकातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्याकाळात त्यांना एकत्र पाहणं चाहत्यांना खूप आवडायचं. या जोडीच्या प्रेमाची सुरुवात १९९७ला झाली होती. रिपोटनुसार, ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र एकमेकांना डेट केल्यानंतर २००२मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर त्याचा सलमान पूर्णपणे बदलला. याबाबत अभिनेता व राजकीय नेते रवि किशन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. त्यामुळे या दोघांची नावं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. (Salman condition after breakup with aishwarya)
अभिनेता रवि किशन यांनी सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याबरोबरच्या ब्रेकअपनंतर सलमान कोणत्या परिस्थितीतून जात होता याबाबत वक्तव्य केलं. या मुलाखतीत सलमान ब्रेकअपपूर्वी कसा होता आणि ब्रेकअपनंतर कसा झाला याबाबत खुलासा केला. याबाबत बोलताना रवि किशन म्हणाले, “एके काळी सलमान बॉलिवूडचा उत्साह होता. त्याचा तो उत्साह त्याच्या चित्रपटांमध्येही दिसायचा. जो नेहमी मजेत असायचा, मजा-मस्ती करायचा पण त्यानंतर सलमान पुर्णपणे शांत, अबोल झाला”. ब्रेकअपनंतर सलमानची खूप वाईट अवस्था झाली होती.

या मुलाखतीत त्यांनी ‘तेरे नाम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानबरोबरचे अनुभव सांगत म्हणाले, “तेरे नाम शुटिंगदरम्यान सलमान अगदी खचून गेला होता. तो आपल्यातच गुंग असायचा त्याकाळात तो पूर्णपणे तुटून गेला होता. सलमानच्या याच परिस्थितीमुळे या चित्रपटात त्याचा अभिनय अजून निखरून आला. प्रेक्षकांनी त्याच्या या चित्रपटातील पात्राला व अभिनयाला भरभरून प्रेम दिलं”.

पुढे रवि किशन सांगतात, “सलमान एक चांगला अभिनेताच नाही तर तो एक चांगला माणूसही आहे. मी त्यावेळचा त्याच्या प्रवासा जवळून पाहिला आहे. तो सेटवरच दोन अडीच तास वर्कआउट करायचा. तो पूर्ण दिवस शुटिंग करायचा आणि त्यानंतरही तो जिम करण्यासाठी वेळ काढायचा. मी त्याच्याकडूनच शिकलो आहे की, काहीही झालं तरी तुम्ही आयुष्यात कितीही दुःखी असो, शुटिंगनंतर तुम्ही कितीही थकले असाल तरीही तुम्ही दीड ते दोन तास कसरत केली पाहिजे ”.
‘तेरे नाम’ चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सलमानबरोबर अभिनेत्री भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेतु’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. रवि किशन यांना या चित्रपचात सहय्यक भूमिका साकारली होती.