Arbaaz Khan : सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी सध्याचा काळ हा खूप कठीण आहे. एकीकडे सलमानला त्याचा जवळचा मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मोठा धक्का बसला असताना, दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोईपासून त्याच्या जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोईने बाबा सिद्दिकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि एका कथित सोशल मीडिया पोस्टमध्ये या हत्येचे श्रेय सलमानशी असलेल्या त्याच्या खास मैत्रीला दिले. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सलमानचा भाऊ अरबाजने त्याच्या कुटुंबाची सध्या काय स्थिती आहे याबाबत खुलासा केला.
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची माहिती आहे. खान कुटुंबीयही चिंतेत आहेत. अरबाज खानने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सलमान खानला सुरक्षित ठेवण्यासाठी तो आणि संपूर्ण कुटुंब काय करत आहेत. अरबाज खान म्हणाला, “आम्ही ठीक आहोत. मी असे म्हणणार नाही की आम्ही पूर्णपणे ठीक आहोत, कारण सध्या कुटुंबात बरेच काही चालू आहे. पूर्णपणे प्रत्येकजण काळजीत आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi कार्यक्रम संपला, पण आता शोमध्ये सहभागी झालेले रिलस्टार कसं जगतात आयुष्य?, सध्या काय करतात?
सलमानच्या सुरक्षेबद्दल अरबाज पुढे म्हणाला, “आम्ही आमच्याकडून शक्य तितके सगळं काही उत्तम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण हे सुनिश्चित करत आहोत की गोष्टी जशा पाहिजे तशा घडतील आणि सलमान सुरक्षित राहील”. अरबाज पुढे म्हणाला की, “प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. आम्हाला तेच हवे आहे”. लॉरेन्स बिश्नोईने या वर्षी एप्रिलमध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केल्याची माहिती आहे. त्यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांनाही धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई अनेक वर्षांपासून सलमानच्या मागे लागले आहेत.
हे प्रकरण १९९८ च्या काळवीट प्रकरणाशी संबंधित आहे. एका रात्री ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगदरम्यान राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार करण्यात आली. असा आरोप सलमानवर झाला होता. २०१८ साली लॉरेन्स बिश्नोईने सलमानने शिकार केलेल्या काळवीटाचा बदला घेणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून तो सलमानच्या मागे लागला आहे. बिष्णोई समाज हरणाची, विशेषतः काळ्या हरणाची पूजा करतो. काळवीट प्रकरणात सलमानचे नाव आल्यावर लॉरेन्सने सलमानविरुद्ध युद्ध सुरु केले आणि त्याला उघडपणे धमक्या दिल्या.