Liam Payne Death : हॉलिवूडचा स्टार गायक आणि ‘बॉयबँड वन डायरेक्शन’चा माजी सदस्य लियाम पायने याचे निधन झाले असल्याचं समोर आलं आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये हॉटेलच्या खोलीच्या खिडकीतून पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आहे. गायकाच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. ब्यूनस आयर्स पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लियाम अर्जेंटिनाच्या राजधानीतील ट्रेंडी पालेर्मो भागातील कासा सुर हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडला होता आणि त्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याचा जागीच मृत्यू झाल्याची पुष्टी केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की, त्यांना कॅपिटॉलच्या पालेर्मो येथील हॉटेलमधून ड्रग्ज व अल्कोहोलच्या प्रभावाखाली असलेल्या एका व्यक्तीबद्दल कॉल आला होता. निवेदनात म्हटले आहे की, हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले की त्यांनी हॉटेलच्या मागून मोठा आवाज ऐकला आणि जेव्हा पोलिस तेथे पोहोचले तेव्हा त्यांना एक व्यक्ती त्यांच्या खोलीच्या बाल्कनीतून पडल्याचे दिसले. आपत्कालीन कामगारांनी ३१ वर्षीय ब्रिटीश गायकाच्या मृत्यूची पुष्टी केली.
गायकाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, MTV ने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. पेनेचे रेकॉर्ड लेबल रिपब्लिक रेकॉर्ड्स किंवा त्याचे मालक युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप यांच्याशी टिप्पणीसाठी त्वरित संपर्क साधता आला नाही.पेनेला हॅरी स्टाइल्स, झेन मलिक, नियाल होरान आणि लुई टॉमलिन्सन यांच्यासह पॉप बँड वन डायरेक्शनचे सदस्य म्हणून जागतिक कीर्ती मिळाली. हा बँड २०१० मध्ये एक्स फॅक्टर दरम्यान तयार झाला होता. तथापि, हा बँड २०१६ मध्ये तुटला आणि त्याचे सर्व सदस्य वेगळे झाले.