Salma Khan Birthday : सलमान खानने त्याची आई सलमा खानचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. घरच्या घरीच कुटुंबियांसह त्यांचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमा खान यांच्या वाढदिवसानिमित्त एक क्यूट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमा तिचा लहान मुलगा सोहेलबरोबर डान्स करताना दिसत आहे. बॉबी देओल आणि वरुण धवन यांसारख्या अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट करुन त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सलमान खानने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना आई सलमाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ दाखवला आहे. सलमान त्याच्या आई-वडिलांच्या खूप जवळ आहे आणि या गोष्टी सर्वश्रुत आहेत.
आई सलमा खानच्या वाढदिवसानिमित्त सलमानने त्याच्या ‘मदर इंडिया’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक गोंडस क्लिप शेअर केली आहे. तिला शुभेच्छा देताना सलमानने लिहिले की, ‘मम्मी, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मदर इंडिया, आमचे जग”. ९ डिसेंबर रोजी सलमानने त्याच्या इंस्टाग्रामवर आई सलमा खान आणि भाऊ सोहेल खान यांचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये आई-मुलगा एकत्र नाचताना दिसत आहेत. ही पार्टी त्याच्या आईसाठी आयोजित केल्याचे दिसते.
‘ॲनिमल’ स्टार बॉबी देओलने अनेक रेड हार्ट इमोजी शेअर करुन अभिनेत्याच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. वरुण धवननेही आपल्या आईच्या डान्स व्हिडिओवर आपले प्रेम व्यक्त केले आहे. गौरी खाननेही रेड हार्ट इमोजी शेअर करुन सलमानच्या आईला खूप प्रेम दिले आहे. बॉलीवूडमधील दिग्गज लेखक जोडी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ या माहितीपटात अरबाज खानने सांगितले आहे की, त्याची आई सलमाने आपल्या मुलांना कधीही त्यांच्या वडिलांविरुद्ध आणि त्यांची दुसरी पत्नी हेलन यांच्याविरुद्ध काहीही चुकीचे सांगितले नाही.
तो म्हणाला होता की, “माझ्या आईने आम्हाला कधीही आमच्या वडिलांच्या विरोधात विचार करण्यास किंवा बोलण्यास प्रेरित केले नाही. त्यांच्या स्वतःच्या समस्या होत्या, परंतु त्यांनी कधीही आम्हाला असा विचार केला नाही की तुमचे वडील असे आहेत किंवा ते असे करतात. कधीच नाही”.