बॉलिवूडमधील सतत चर्चेत राहणारे एक जोडपे म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या दोघांनी मात्र या चर्चांवर कोणतेही अधिकृत भाष्य केलेलं नाही. अशातच आता या दोघांबद्दलच्या आणखी एका चर्चेने जोर धरला आहे अआणि ही चर्चा म्हणजे त्यांच्या दुसऱ्या अपत्याची. अभिषेक बच्चनला नुकतंच ऐश्वर्या रायबरोबरच्या त्याच्या दुसऱ्या अपत्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो लाजला. अभिनेता अभिषेक बच्चन नुकताच रितेश देशमुखच्या ‘केस तो बनता है’ या शोमध्ये आला होता आणि त्यादरम्यान अभिनेत्याला दुसऱ्या मुलाच्या प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आले. (Abhishek Bachchan blushing on second child)
‘केस तो बनता है’ या शोचा भाग नुकताच पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे आणि या भागाचा एक व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते त्यावर सतत प्रश्न विचारत आहेत. यावेळी रितेश अभिषेकला म्हणाला की, “अमिताभ जी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक. ही सर्व नावे ‘अ’ अक्षराने सुरू होतात. मग जया आंटी आणि श्वेता यांनी काय केले”. यावर अभिषेक बच्चन मोठ्याने हसला आणि म्हणाला की, “हे त्यांना विचारावे लागेल. पण कदाचित ती आमच्या कुटुंबात एक परंपरा बनली आहे. अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या…”
आणखी वाचा – ‘पुष्पा-२’ वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटात करणी सेनेचा अपमान झाल्याचा आरोप, म्हणाले, “घरात घुसून…”
यावेळी अभिषेकला अडवत रितेश असं म्हणाला की, “आराध्यानंतर?”. अभिषेकने उत्तर दिले, “नाही, पुढची पिढी आल्यावर बघू”. मग रितेशने मस्करीत म्हटलं की, “इतकी वाट कोण बघतं? जसं रितेश, रियान, राहिल. तसे, अभिषेक, आराध्या आणि…”. रितेशच्या या वाक्यावर अभिषेक बच्चन लाजला आणि त्याला म्हणाला की, “वयाचं तरी भान ठेव रितेश.. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे”. यानंतर रितेशने अभिषेकच्या पायाला स्पर्श केला आणि सर्वजण हसले.
दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या अलीकडेच त्यांची मुलगी आराध्याच्या १३व्या वाढदिवसानिमित्त एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. याआधी ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमुळे पार्टीत अभिषेक असल्याचा अंदाज बांधला जात होता, नंतर एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये अभिषेकदेखील ऐश्वर्या आणि आराध्याबरोबर पाहायला मिळाला.