रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सलमानचे वडीलच खोटं बोलत आहेत आणि…”, बिश्नोई गँगकडून सलमान खानला माफ करणार नसल्याचं भाष्य, म्हणाले, “चूक झाली…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2024 | 3:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salman Khan Blackbuck Case

बिश्नोई गँगकडून सलमान खानला माफ करणार नसल्याचं भाष्य

Salman Khan Blackbuck Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या सतत चर्चेत असलेला दिसतोय. बिष्णोई समाज सलमान खानवर नाराज असल्याचं समोर आलं. वास्तविक, सलमान खानवर काळवीट मारल्याचा आरोप होता. आणि बिष्णोई समाज काळ्या हरणाची पूजा करतो. याच कारणामुळे सलमान खानने त्यांच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, अशी बिष्णोई समाजाची इच्छा होती. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने तर सलमान खानला धमकावले होते. त्याच्या घराबाहेरही गोळ्या झाडण्यात आल्या. या सगळ्या दरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांनी लेकाची बाजू घेत मत मांडलेलं दिसलं.

वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सलीम खान म्हणाले की, “जर सलमानने कोणत्याही प्राण्याला मारले नसेल तर त्याने माफी का मागायची?”. तर सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली या प्रकरणावरुन म्हणाली होती की, सलमाननेच तिला काळवीट मारल्याचे सांगितले होते. मात्र, बिश्नोई समाज काळ्या हरणाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हते.

आणखी वाचा – Video : मैत्री जपली! वैभव चव्हाणने दणक्यात साजरा केला सूरज चव्हाणचा वाढदिवस, म्हणाला, “सगळ्यांनी खांद्यावर उचलून…”

या सगळ्या दरम्यान बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बिश्नोई एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले होते, “सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की, सोमी अली माझ्या संपर्कात नाही. दुसरे असे की, कोणी कोणाच्या वतीने माफी मागितली किंवा पूजा केली तर समाज अशी परवानगी देत ​​नाही. गुन्हा करणाऱ्याला माफी मागावी लागते. त्याला पश्चाताप करावा लागतो. माफीचा प्रश्न आहे, आता सलमानच्या वडिलांनी खोटे सांगितले की, सलमानने असे काही केले नाही, त्यामुळे आता सलमानला माफ करता येणार नाही”.

आणखी वाचा – “सहानुभूतीवरुन अनेक टोमणे मला मिळाले पण…”, दिव्यांगांसाठी अंकिता वालावलकरचं काम, म्हणाली, “कोकणातही गेले नाही…”

ते पुढे म्हणाले, “खोटे बोलून तुम्ही सुटू शकत नाही. चूक झाली हे सत्य सांगून वाचवता येईल, बाकी कोर्ट केस आहे, ते चालू आहे. आता आम्ही त्यांना माफ देखील करणार नाही कारण हे लोक खोटे बोलत आहेत. आधी पैशाचा आरोप झाला. तो आमचा गुन्हेगार आहे. मी पंतप्रधान, गृहमंत्री व कायदामंत्र्यांना या प्रकरणाची दररोज सुनावणी करुन सलमानला शिक्षा व्हावी, अशी विनंती करतो”.

Tags: bishnoi gangsalman khanSalman Khan Blackbuck Case
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tharla Tar Mag serial update Arjun and Sayali love each other but they will be separated due to misunderstanding new promo viral

Tharla Tar Mag : अर्जुन-सायलीचे एकमेकांवर प्रेम पण गैरसमजामुळे दोघे दुरावणार? नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.