बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या प्रेमकथांबद्दल आजही अनेक चर्चा होताना दिसून येतात. हे कलाकार काही काल एकत्र होते. पण काही कारणास्तव ते एकत्र येऊ शकले नाहीत आणि आपले आवडते कलाकार एकत्र यावेत अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. अशीच इच्छा होती ती सलमान खान व ऐश्वर्या राय यांनी एकत्र येण्याची आणि चाहत्यांची ही इच्छा अनंत अंबानीच्या लग्नात पूर्णदेखील झाली. सध्या सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहेत. याच लग्नातील सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, तो म्हणजे ऐश्वर्या व सलमान यांचा.
अनंत व राधिका यांच्या लग्नात ऐश्वर्या व सलमान यांनी पापाराझींसाठी एकत्र पोज दिल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्याने सलमानचं हात पकडला असून त्याच्या एका बाजूला ऐश्वर्या व सुदऱ्या बाजूला बहीण अर्पिता उभी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हा फोटो दिसताना अगदीचं खरा वाटत असला तरी हा फोटो काही खरा नाही. AI तंत्रज्ञान वापरुन हा फोटो बनवला आहे. त्यामुळे हा फोटो बघून अनेकांच्या आनंदावर विरझण पडलं आहे.
AI is really dangerous😭 pic.twitter.com/0QarGrqyJp
— Prayag (@theprayagtiwari) July 13, 2024
सलमान व ऐश्वर्या यांनी अनंत-राधिका यांच्या लग्नात एकत्र हजेरी लावली नसली तरी त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सलमान आपल्या बहिणीसह या सोहळ्यात सहभागी झाला होता, तर ऐश्वर्या मात्र तिच्या मुलीसह या लग्नसोहळ्यात वावरताना दिसली. यावेळी बच्चन कुटुंबात काही अलबेल नसल्याच्यादेखील अनेक चर्चांना उधाण आले. अनंत-राधिका यांच्या लग्नात अमिताभ बच्चन, जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा, जावई निखिल नंदा, नात नव्या, नातू अगस्त्य नंदा आणि मुलगा अभिषेक यांनी एकत्र वेगळी एंट्री घेतली.
तर ऐश्वर्याने मुलगी आराध्याबरोबर वेगळी एन्ट्री घेतली. त्यामुळे ऐश्वर्या व अभिषेक यांच्या नात्याबद्दलही अनेक तर्क-वितर्क लावले गेले. दरम्यान, सलमान व ऐश्वर्या यांचा एकत्र फोटो बघून त्यांच्या अनेक चाहत्यांना आनंद झाला. मात्र हा फोटो खरा नसून खोटा असल्याचे समजताच अनेक चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरले आहे.