अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १२ जुलै रोजी अनंत व राधिका हे मुंबई येथे जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज व मान्यवर लोकांनी हजेरी लावली होती. अनंत-राधिका यांच्या लग्नात अगदी बॉलिवूड, हॉलिवूडपासून अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच काल अनंत-राधिकाचा शुभाशीर्वाद सोहळा चालू आहे. यासाठी खास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली.
अनंत व राधिका यांच्या आशीर्वाद सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची एन्ट्री होताच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यानंतर मोदींनी संपूर्ण अंबानी कुटुंबीयांची भेट घेतली. सर्वांची भेट घेतल्यावर पंतप्रधान नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले. अनंत व राधिकाला भेटवस्तू देऊन त्यांनी आशीर्वाद दिले. यावेळी अनंत – राधिकाने पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं अनेक व्हिडीओसमधून पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदींनी २ तास ४० मिनिटे थांबून रात्रीचे जेवणही केले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वैदिक रितीरिवाजांनुसार लग्न केले. यावेळी, वधू आणि वरचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये हे जोडपे खूप सुंदर दिसत होते. त्यांच्या डी-डेसाठी, अनंत-राधिकाने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले पोशाख परिधान केले होते. अनंत लाल रंगाच्या शेरवानीमध्ये तर राधिका पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.
आणखी वाचा – नोकरदारांसाठी रविवारचा दिवस आहे खास, बढतीसह पगारातही होणार वाढ, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
दरम्यान, मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकट्या लेकाच्या लग्नात कसलीच कमी भासू दिली नाही. अनेक दिग्गज व बड्या कलाकारांना लेकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले असून अनेकांनी या लग्नसोहळ्याला खास हजेरी लावत चार चाँद लावले आहेत. राजकारण, मनोरंजन, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली.