Salim Khan Reacts On Baba Siddique Death : सलमान खानचे वडील व प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी लॉरेन्स बिश्नोईकडून अभिनेत्याला मिळणाऱ्या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली असतानाच, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या सलमानमुळेच झाली आहे का, यावरही त्यांनी मौन सोडले आहे. बाबा सिद्दीकी हे सलमानचे जवळचे मित्र होते आणि त्यांची १२ ऑक्टोबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोईने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती आणि सलमानबरोबरच्या मैत्रीचे कारण सांगितले होते. सलमान खान व बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा काही संबंध आहे का? यावर सलीम खान यांनी मौन तोडले आहे. हे नक्की प्रकरण काय?
बाबा सिद्दीकीच्या हत्येचा आणि सलमान खानचा काहीही संबंध नाही, असे सलीम खान यांनी ‘एबीपी न्यूज’शी बोलताना सांगितले. सलीम खान म्हणाले, “नाही, मला नाही वाटत त्याचा काही संबंध आहे. बाबा सिद्दीकी यांचा याच्याशी काय संबंध असेल? कोणालाही कशाचाही संबंध लावता. तुम्ही आम्हाला सलाम केला नाही तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू. जर तुम्ही आम्हाला नमस्कार केला नाही तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू”. सलीम खानला विचारण्यात आले की, बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती, कारण ते सलमानला लॉरेन्स बिश्नोईपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तर यावर सलमानचे वडील म्हणाले, “पोलीस सलमान आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देत आहेत. त्यात काय आहे? प्रत्येकाला वाचायचे आहे. आयुष्य जे काही आहे ते कधीही संपू शकते”.
आणखी वाचा – रेमो डिसूजा व त्याच्या पत्नीवर कारवाई, करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, नक्की प्रकरण काय?
त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी द्यायला सुरुवात केली. १८ ऑक्टोबरला त्याच्या टीमने पुन्हा एकदा सलमानला धमकीचा मेसेज पाठवला. ५ कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीसह हा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आला होता. तेव्हापासून सलमानच्या सुरक्षेत तर आणखी वाढ करण्यात आली आहे, पण अशी बातमी आहे की अभिनेत्याने स्वत:साठी एक नवीन निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे, ज्यामध्ये बॉम्ब अलर्टसह अनेक सुरक्षा सेन्सर आहेत.
आणखी वाचा – गप्पा सुरु असतानाच ओरीने रणवीर सिंहचा ओढला चष्मा, अभिनेत्याचा चेहऱ्याचा बदलला रंग, केलं असं काही की…
बाबा सिद्दीकीने सलमान खान व शाहरुख यांच्यातील पाच वर्षांचे भांडण संपवून त्यांची मैत्री घडवून आणल्याची माहिती आहे. तो सलमानच्या खूप जवळ होता. मात्र १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान याच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी दोन गोळीबारांना अटक केली. शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी आणखी काही आरोपींना या प्रकरणावरुन अटक करण्यात आली.