ओरहान अवतरमणी उर्फ ओरी हा गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारं एक नाव आहे. ओरी हा प्रत्येक बॉलिवूड पार्टीमध्ये दिसतो. ओरी आणि बोलिवूड अभिनेत्रींचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कोणतीच एक विशिष्ट अशी अभिनेत्री नाही तर दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, माधूरी दीक्षित, कियारा अडवाणी, सारा अली खान, कतरिना कैफ इतकेदच नाही तर थेट नीता अंबानी यांच्याबरोबर देखील ओरीचा फोटो बघायला मिळतो. पण बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये अगदी सहज वावरणारा हा ओरी नक्की काय करतो हा अनेकांना पडलेला मोठा प्रश्न आहे. हाच प्रश्न एका बॉलिवूड अभिनेत्याने ओरीला विचारला आहे. (Orry and Ranveer Singh video)
ओरी नक्की काय करतो असं अभिनेता रणवीर सिंहने त्याला विचारले असून ओरीने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेता रणवीर ओरीच्या आयुष्याशी संबंधित मनोरंजक प्रश्न विचारत आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्याकडे बघत रणवीरने ओरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि गंमतीने हिंदीत म्हटले आहे की, “अनेकदा आपल्या देशात लोक दोन प्रश्न विचारतात. पहिला म्हणजे कट्टप्पाने बाहुबलीला का मारले? आणि दुसरा म्हणजे हा ओरी नक्की काय करतो?”
आणखी वाचा – Bigg Boss 18 : दुसऱ्या आठवड्यात ‘बिग बॉस’मधून ‘हा’ सदस्य घराबाहेर?, सलमान खान चांगलीच शाळा घेणार
रणवीर ओरीला हा प्रश्न विचारात असताना ओरी त्याच्या डोळ्यांवरील गॉगल काढण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा रणवीर कॅमेराकडे बघतो आणि प्रश्न विचारतो तेव्हा ओरीने गंमतीने गॉगल काढण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वत: लावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, रणवीरने त्याला मध्येच थांबवतो आणि म्हणातो की, “नो चान्स” (संधी नाही). दोघांचा हा व्हिडीओ राधिका अंबानीच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील आहे. या वाढदिवस पार्टीला बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली होती. तेव्हा ओरी व रणवीर यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे.
आणखी वाचा – ऐश्वर्या रायच्या आयुष्याशी निगडीत पाच रहस्य, याच कारणांमुळे सासरच्या मंडळींनी सोडली अभिनेत्रीची साथ?
दरम्यान, अभिनेता रणवीर सिंग नुकताच बाबा झाला असून त्याच्या चेहऱ्यावर लेक झाल्याचा आनंद पाहायला मिळतो. रणवीर व दीपिका दोघेही रोहित शेट्टीच्या आगामी ॲक्शन चित्रपट ‘सिंघम अगेन’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. या बहुप्रतिक्षित चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.