रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’चं शूट नक्की कसं होतं?, जेठालालचं दुकान, गोकुळधाम सोसायटीची खरी अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 19, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 

'तारक मेहता…'चं शूट नक्की कसं होतं?,

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah  : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही देशातील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ही मालिका वेड लावते. प्रेक्षक ‘तारक मेहता…’ बद्दल इतके वेडे आहेत की त्यांना ‘दयाबेन’ दिशा वकानीपासून ते शोचा भाग नसलेल्या इतर कलाकारांपर्यंत अनेक कलाकारांची आठवण नेहमीच येते. दयाबेन, जेठालाल, पोपटलाल यांच्यापासून ते टप्पू सेनेपर्यंत अगदी गोकुळधाम सोसायटीचे नावही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहे. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे चित्रीकरण नेमकं कसं होतं याबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे शूटिंग एकाच ठिकाणी होते आणि ते म्हणजे गोकुळधाम सोसायटी. मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये या सोसायटीचा सेट तयार करण्यात आला आहे. हा सेट बाहेरुन सोसायटीसारखा दिसत असला तरी आतमध्ये रिकामी आहे. मालिकेचे चित्रीकरण दोन भागांमध्ये विभागलेले आहे. एका भागात गोकुळधाम सोसायटीचा बाहेरचा भाग आणि दुसऱ्या भागात सर्व गोकुळधाम रहिवाशांचे फ्लॅट आहेत.

आणखी वाचा – Video : सात वर्षांची आहे बादशाहची लेक, घटस्फोट झाला पण मुलीशी जवळीक, रॅपही करते अन्…

View this post on Instagram

A post shared by TMKOC_Neela Film Productions (@taarakmehtakaooltahchashmahnfp)

एका भागात गोकुळधाम सोसायटीचे कंपाऊंड तर दुसऱ्या भागात घर दाखवले आहे. येथे फक्त घराचे व बाल्कनीचे बाहेरील भाग शूट केले जातात. कोणतेही आऊटडोअर शूट असेल तर ते सेटवरच बांधलेल्या कंपाऊंडमध्ये केले जाते. पण शूटिंग कुणाच्या घरातील करायचं असेल तर शूटिंग या सेटवर नाही तर कांदिवलीत केलं जातं. २०२३ मध्ये, एका YouTuber ने ‘तारक मेहता…’ची शूटिंग कशी होते आणि गोकुळधाम सोसायटी कशी दिसते हे दाखवले होते. सोनिया माहमी नावाच्या या व्लॉगरने दाखवले होते की, शोच्या कलाकारांना सेटवरच क्वार्टर, एक किचन आणि प्ले एरिया आहे. तर जेठालाल यांचे इलेक्ट्रॉनिक स्टोअरही बनवण्यात आले आहे की ते अगदी खरे वाटेल.

आणखी वाचा – Video : जिनिलीया देशमुखचा नवरा, मित्र-मंडळींसह घरातच भयंकर वेडेपणा, गाणं वाजताच बेभान होऊन नाचले अन्…

वापरात नसलेल्या सेटवर बांधलेले क्वार्टर्स किंवा फ्लॅट्स मोठ्या पत्र्याने झाकले जातात जेणेकरून ते घाण होऊ नये. ‘तारक मेहता…’मधील गोकुळधाम सोसायटीला ‘मिनी इंडिया’ किंवा आठवे आश्चर्य देखील म्हटले जाते, कारण येथे विविध धर्म व जातीचे लोक एकत्र राहतात. या शोने दिशा वकानी, दिलीप जोशी, अमित भट्ट, शैलेश लोढा आणि मुनमुन दत्ता यांच्यासह जवळपास प्रत्येक कलाकाराला प्रसिद्धी मिळवून दिली.

Tags: famous tv serialTaarak Mehta Ka Ooltah ChashmahTaarak Mehta Ka Ooltah Chashmah serial shoot
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
20 october Horoscope

20 october Horoscope : कुंभ व तुळ राशीच्या लोकांना नोकरीत मिळणार बढती, तर कन्या राशीच्या लोकांना घडणार परदेशवारी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.