बॉलिवूड सिनेसृष्टीत कलाकारांबरोबरचं त्यांची मुलंही नेहमीच चर्चेत असतात. या कलाकारांबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल जाणून घ्यायला प्रेक्षकांना खूप आवडतं. बरेच कलाकार पालक झाल्यामुळे चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. काहींनी पालक झाल्यांनतर त्यांच्या मुलांचा चेहरा लपवून ठेवला, तर काहींनी त्यांच्या मुलांच्या नावाचा अर्थ सांगितला. आणि यामुळे ही कलाकार मंडळी व त्यांची मुलं कायमच चर्चेत राहिली. यांत बॉलिवूड कलाकारांच्या मुलांच्या हटके नावाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. (Bollywood Celebrity Children Name)
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतीच आई झाली असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. विराट कोहलीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. याचबरोबर त्यांनी त्यांच्या लेकाचे हटके नाव ठेवले. विराट व अनुष्का यांनी त्यांच्या लेकाचे नाव अकाय असे ठेवले. या नावाचा अर्थ म्हणजे पूर्ण चंद्र. याचा अर्थ निराकार आहे, असेही काहींनी म्हटले आहे. याचबरोबर प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांच्या नावांचा अर्थ आपण पाहणार आहोत.
सेलिब्रिटींच्या मुलांच्या नावांच्या यादीत रणबीर कपूर-आलिया भट्टची मुलगी राहा ते स्वरा भास्कर-फहाद अहमदची मुलगी राबिया यांच्या नावांचा समावेश आहे. अनुष्का व विराटची मुलगी वामिका हिच्या नावाचा अर्थ काय आहे तर वामिका हे दुर्गा मातेचे दुसरे नाव आहे. बिपाशा बासूने करण सिंग ग्रोवरबरोबर लग्न केले. वयाच्या ४३व्या वर्षी तिने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव देवी असे ठेवण्यात आले. देवी या नावाचा अर्थ आहे दैवी शक्ती.
सोनम कपूरने बिझनेसमन आनंद आहुजासह लग्न केले. २०२२मध्ये सोनमने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव त्यांनी वायु असं ठेवले. वायु म्हणजे वारा. रणबीर कपूरसह लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच आलिया भट्ट आई झाली. रणबीर व आलिया यांच्या मुलीचं नाव राहा ठेवण्यात आलं. राहा या नावाचा अर्थ आनंद आहे. स्वरा भास्करने फहाद अहमदबरोबरच्या लग्नाचे फोटो शेअर करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव राबिया असे ठेवले, राबिया म्हणजे खोल.