Saif Ali Khan Health Update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. सध्या या अभिनेत्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाने अभिनेता कधी आणि कोणत्या वेळी रुग्णालयात पोहोचला आणि त्याची प्रकृती नेमकी कशी आहे याबद्दल एक निवेदन जारी करत अपडेट दिले आहे. लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्मानी यांनी सांगितले की, ‘सैफ अली खानवर त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केले आणि त्यांना पहाटे ३.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आले’.
उत्तमानी म्हणाले की, “सैफवर ६ जखमा होत्या आणि दोन खोल जखमा होत्या. यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. उत्तममणी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहे”. सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सध्या सैफवर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती केली आहे, अभिनेत्याच्या तब्येतीबाबत ते अपडेट देत राहतील असेही त्यांनी कळवले आहे.
आणखी वाचा – धक्कादायक! सैफ अली खानवर चाकू हल्ला, घरात घुसून ज्ञातांकडून अनेकदा वार, रुग्णालयात उपचार सुरु
चोरट्यांनी प्रथम घरातील मोलकरणीवर हल्ला केला. मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील हाणामारी ऐकून सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्यानंतर हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. सैफच्या मोलकरणीच्या हाताला दुखापत झाली आहे आणि तिची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, सैफच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नाही. सीसीटीव्हीमध्ये कोणतीही एंट्री दिसत नाही. तो व्यक्ती घरात कसा घुसला याचा तपास करण्यासाठी पोलिस सैफच्या घरी आहेत.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
सैफ अली खानने या प्रकरणाबाबत सांगितले की, काल रात्री तो घरी असताना अचानक कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. करीना कपूर आणि मुले तिथे होती आणि ते सुद्धा ही घटना पाहून घाबरले. हल्लेखोराने त्याच्यावर तीन वेळा हल्ला केला. दुखापतीमुळे तो त्याला हरवू शकला नाही. तर इतर नोकर झोपले होते. बाकी सर्व लोक आपापल्या घरी होते. नंतर तो माणूस पळून गेला आणि रात्र असल्याने सैफला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.